पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 09:04 PM2022-10-22T21:04:25+5:302022-10-22T21:08:27+5:30

कोल्हापूरात इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव

Diwali 2022 at Kolhapur Festival of lights Deepotsav was celebrated by 'Kolhapur Hikers' at Panhala fort | पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव

पन्हाळ्यावर 'कोल्हापूर हायकर्स'ने साजरा केला दीपोत्सव

googlenewsNext

पन्हाळा, लोकमत न्यूज नेटवर्क: सोमेश्वर तलाव, छत्रपती संभाजी मंदिर, छत्रपती शिवाजी मंदिर या ठिकाणी दिपावलीच्या पूर्वसंध्ये ला 'कोल्हापूर हायकर्स' यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत व हर्षल सुर्वे व मान्यवर हजर होते. ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात  दिवाळी साजरी करतोय तेच गड-किल्ले ऐन सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या ह्या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दीपोत्सव करत असल्याचे हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.

'कोल्हापूर हायकर्स'तर्फे आयोजित दीपोत्सव-सोमेश्वर तलावावरील फोटो

कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एक सांज पन्हाळगडवर स्वराज्याच्या गडकोटांवर एक सांज पन्हाळगडवर  धनत्रयोदशी ची संध्याकाळ या संकल्पनेतून वर्षभर अपरिचित गड किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख आहे.

बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात. आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्स तर्फे गेल्या दहा वर्षापासुन पन्हाळा गडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे.

Web Title: Diwali 2022 at Kolhapur Festival of lights Deepotsav was celebrated by 'Kolhapur Hikers' at Panhala fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.