Diwali : सीमेवर तैनात जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:08 PM2018-11-02T12:08:51+5:302018-11-02T12:11:49+5:30
चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात न. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा बोलत होते.
कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना दिवाळीनिमित्त घरची मिठाई मिळाल्यानंतरचा आनंद मोठा असतो; कारण प्रत्येक जवानाला युद्ध जिंकण्यासाठी देशवासियांचे प्रेम महत्त्वाचे असते; त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी दुणावतो, असे प्रतिपादन एन. सी. सी. गु्रप कमांडर कर्नल राजेश शहा यांनी केले. चौदा आसाम रायफल्सच्या जवानांना युनिव्हर्सल पर्सनल सिक्युरीटीतर्फे मिठाई पाठविण्यात आली. त्यानिमित्त अयोध्या टॉवर्स येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कर्नल शहा म्हणाले, देशावरच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांना दिवाळीची मिठाई खायला मिळणे म्हणजे पुण्याईचे काम आहे, अशा प्रकारच्या देशप्रेमामुळे आमच्या जवानांनी अनेक युद्धे जिंकली आहेत. त्यात १९९९ साली पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धही केवळ देशवासीयांच्या पाठबळ व प्रेमापोटीच जिंकले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख म्हणाले, जीव तोडून देशाच्या सीमेवर देशवासीयांचे संरक्षण करणाºया जवानांकरिता हा कार्यक्रम म्हणजे घरच्या फराळाचा आस्वाद महत्त्वाचा आहे. जवान आणि किसान हे दोन्ही प्रामाणिकपणे काम करतात; त्यामुळे देशवासीयांची सर्व कामे सुरळीत सुरू आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आसाम रायफल्सचे जवान निलेश शिंदे व दिलीप पाटील यांनी ही मिठाई स्वीकारली.
यानिमित्त कोळवण (ता. भुदरगड) येथील सामाजिक कार्यकर्ते सागर गुरव यांनाही मान्यवरांच्या हस्ते अत्यवस्थ रुग्णाच्या सेवेसाठी बोलेरो जीप प्रदान करण्यात आली. स्वागत कॅप्टन उत्तम पाटील यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, प्रा. अरुण मराठे, पोलीस अधिकारी सचिन पाटील, रविकुमार चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.