पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांबरोबर दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:51 AM2017-10-18T00:51:01+5:302017-10-18T00:55:17+5:30
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांसह शववाहिकेवरील चालक, कर्मचाºयांना नवीन कपडे, फराळ, सेंट, मिठाईचा बॉक्स, आदी साहित्य देऊन
कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांसह शववाहिकेवरील चालक, कर्मचाºयांना नवीन कपडे, फराळ, सेंट, मिठाईचा बॉक्स, आदी साहित्य देऊन त्यांच्यासोबत कोल्हापूरकरांनी दीपावलीच्या पूर्वसंध्येला अनोख्या पद्धतीने स्मशानभूमीत दिवाळी साजरी केली. यामुळे या कर्मचाºयांच्या चेहºयावर हास्य उमटले होते. सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांच्या प्रजासत्ताक सामाजिक संस्थेने हा अनोखा उपक्रम राबविला.
पंचगंगा स्मशानभूमीतील काम करणारे कर्मचारी नेहमीच येथे आल्यानंतर आपुलकी, बंधुभावाची वागणूक देतात. त्यांच्या जीवनात आनंद, उत्साह वाढावा यासाठी गतवर्षापासून प्रजासत्ताक सामाजिक संस्था नरक चतुदर्शीच्या (दीपावली) पूर्वसंध्येला त्यांना दिवाळीचे साहित्य देऊन हा उपक्रम राबविते.
यंदाही पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचारी, शववाहिकेवरील चालक, कर्मचारी यांना चांगल्या पद्धतीचे कपडे, त्यांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळ, सेंट, मिठाई बॉक्स, सुगंधी तेल, आदी साहित्य देऊन त्यांची दिवाळी साजरी केली.
यावेळी अशोक चंदवाणी, राजू पुरोहित, राजू लिंग्रस, नगरसेवक राजाराम गायकवाड, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जयेश कदम, मानसिंग फडतरे, सचिन पाटील, बुरहान नायकवडी, स्वप्निल भोसले, सुशील कोरडे, सचिन तोडकर, सुभाष देसाई, पाडळीचे महेश पाटील यांच्यासह मित्र उपस्थित होते.
खºया अर्थाने हीच माझी दिवाळी
यावेळी दिलीप देसाई म्हणाले, आपल्या कुटुंबाचाच एक भाग समजून स्मशानभूमीतील कर्मचाºयांना दिवाळीची भेट म्हणून हे साहित्य दिले. त्यामुळे खºया अर्थाने हीच माझी दिवाळी आहे. या उपक्रमात माझ्याबरोबर माझे मित्र, हितचिंतक यांचा सिंहाचा वाटा आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते उमेश सूर्यवंशी यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाºयांवर केलेली कविता म्हटली.