‘डीकेटीई’च्या क्षितीजा जाधव हिची इंग्लंड येथे पीएच. डी.साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:27 AM2021-01-16T04:27:57+5:302021-01-16T04:27:57+5:30
इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थिनी क्षितीजा जाधव हिची पीएच. डी.साठी ‘द युनिव्हर्सिटी आॅफ मॅँचेस्टर इंग्लंड’ या ...
इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थिनी क्षितीजा जाधव हिची पीएच. डी.साठी ‘द युनिव्हर्सिटी आॅफ मॅँचेस्टर इंग्लंड’ या विद्यापीठामध्ये निवड झाली आहे. तिने सन २०१५-१६ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून पदवी प्राप्त केली होती. क्षितीजा हिला अॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरींग, साधने व मटेरियल, पॉलिमर्स, मेटल्स, कम्पोजिट्स, कम्प्युटेशनल डिझाईन टुल्स, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि मटेरियल निवड, बायोमटेरियल अशा विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती यामुळे मिळणार आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांनी क्षितीजाचे अभिनंदन केले आहे. क्षितीजा हिला प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन मिळाले.
(फोटो) १५०१२०२१-आयसीएच-०१ (क्षितीजा जाधव)