शेती, घरांचे पंचनामे तत्काळ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:25 AM2021-07-31T04:25:28+5:302021-07-31T04:25:28+5:30
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पीक, घरांचे ...
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पीक, घरांचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन गगनबावडा पंचायत समितीचे सभापती संगीता पाटील यांच्या वतीने तहसीलदार संगमेश कोडे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गगनबावडा तालुका हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारा तालुका म्हणून ओळखला जातो. चालू वर्षी तालुक्यात अतिवृष्टी होऊन महापूर आला. यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, भात पिकांसह घर, दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना शासकीय मदत देऊन दिलासा द्यावा. राज्य शासनाने जाहीर केलेल्या १०,००० रुपये व ५,००० रुपये धान्य स्वरूपातील मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गगनबावडा तालुक्याच्या पंचायत समिती सभापती संगिता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, सदस्या मंगल कांबळे, सदस्य आनंदा पाटील, सामाजिक कार्येकर्ते संजय कांबळे उपस्थित होते.
सोबत फोटो गगनबावडा – अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामे करण्याबाबतचे निवेदन गगनबावडा तहसीलदार संगमेश कोडे यांना देताना तालुक्याच्या पंचायत समिती सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, सदस्या मंगल कांबळे, सदस्य आनंदा पाटील, सामाजिक कार्येकर्ते संजय कांबळे उपस्थित होते.