विकासकामे करा; अन्यथा बेमुदत उपोषण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:33+5:302021-01-16T04:28:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चार वर्षांपासून वारंवार मागणी करूनही प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष करणे. मंजूर रस्ते रद्द करणे, असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : चार वर्षांपासून वारंवार मागणी करूनही प्रभागातील विकासकामांकडे दुर्लक्ष करणे. मंजूर रस्ते रद्द करणे, असा दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे भागातील विकासकामांकडे १५ फेब्रुवारीपर्यंत लक्ष न दिल्यास नगरपालिका प्रवेशद्वारात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नगरसेविका दीपाली बेडक्याळे यांनी निवेदनाद्वारे दिला.
नगरसेविका बेडक्याळे यांच्या प्रभाग क्रमांक १८ मध्ये विकासकामे झाली नाहीत. मंजूर असलेले रस्ते परस्पर रद्द केले. भागातील पाणीप्रश्नही अडचणीचा आहे. याकडे लक्ष घालावे, असे निवेदन नगराध्यक्ष अलका स्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना देण्यात आले. त्यावर पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे व बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिष्टमंडळातील नागरिकांनी पाणी प्रश्नावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.