चांगले काम करा, विकासनिधी देऊ

By admin | Published: January 1, 2017 12:53 AM2017-01-01T00:53:07+5:302017-01-01T00:53:07+5:30

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : विमानतळावर स्वागतासाठी गर्दी

Do good work, give development funds | चांगले काम करा, विकासनिधी देऊ

चांगले काम करा, विकासनिधी देऊ

Next

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नगरपालिकांमधील विकासकामांसाठी निधी देऊ, चांगले काम करा, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जिल्ह्यातील भाजप, ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षांना दिले.
मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हा दौऱ्यावर आले होेते. सायंकाळी धावपट्टीवर हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री काही वेळातच विमानाने जाणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाजपसह मित्र पक्षाचे नगराध्यक्ष, भाजपचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आत प्रवेश देण्यासाठी पास देण्यात आले होते.
सायंकाळी ६.४५ वाजता मुख्यमंत्र्यांचे शिरोळ येथून हेलिकॉप्टरने विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासोबत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, आमदार सुरेश हाळवणकर, आदी मान्यवर होते. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, भाजपचे नगरसेवक विजय सूर्यवंशी यांच्यासह नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना शुभेच्छा देऊन नगरपालिकांमध्ये विकासकामांसाठी निधी देऊ, पण चांगले काम करा, असे सांगितले. यानंतर ६.५० वाजता मुख्यमंत्र्यांचे विमानाने मुंबईकडे प्रयाण झाले.
यावेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, महेश जाधव, राहुल चिकोडे, के. एस. चौगुले, रिपाइं (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी, जयसिंपूरच्या नगराध्यक्ष नीता माने, गडहिंग्लजच्या स्वाती कोरी, पन्हाळ्याच्या रूपाली धडेल, वडगावचे नगराध्यक्ष मोहन माळी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Do good work, give development funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.