वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 01:01 AM2017-05-01T01:01:24+5:302017-05-01T01:01:24+5:30

तात्यासाहेब मस्कर : कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचा कृतज्ञता सोहळा

Do not be satisfied with twenty percent subsidy | वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका

वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका

googlenewsNext



कोल्हापूर : वीस टक्के अनुदानावर मी समाधानी नाही. तुम्हीदेखील राहू नका. पूर्ण अनुदान मिळविण्याच्या लढ्यासाठी एकी कायम ठेवल्यास निश्चितपणे यश मिळेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यांनी रविवारी येथे केले.
मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये समितीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील होते. कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या १७ वर्षांच्या लढ्यास २० टक्के अनुदानाच्या माध्यमातून यश मिळाले. या लढ्यात सहकार्य केलेल्या संघटना, मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
अध्यक्ष मस्कर म्हणाले, विविध आंदोलनाच्या माध्यमातून लढा दिल्याने २० टक्के अनुदान मिळविण्यात यश आले. शिक्षणमंत्र्यांनी वाढीव अनुदान देण्याचा शब्द दिला आहे. शंभर टक्के अनुदान मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील म्हणाले, वीस टक्के अनुदानाबाबतचे यश सहजासहजी मिळालेले नाही. यात अनेकांचे योगदान आहे. पूर्ण अनुदानासाठीच्या कायदेशीर लढ्याला समिती, शिक्षकांनी तयार राहावे.
समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे म्हणाले, शंभर टक्के अनुदान मिळविण्याचे आपले ध्येय आहे. त्यासाठी नियमांच्या चाकोरीत राहून गुणवत्ता टिकविण्यासह मराठी शाळा वाचविण्यासाठी कार्यरत राहा. समितीतर्फे आता ४० टक्के अनुदानासाठी लवकरच लढा सुरू केला जाईल.
यानंतर दादा लाड, एस. डी. लाड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, लेखाधिकारी वैभव राऊत, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी भीमराव टोणपे, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, मुख्याध्यापक संघ विनाअनुदान समितीचे अध्यक्ष एस. एम. पाटील, विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रकाश पाटील, सुनील कल्याणी, गजानन काटकर, शिवाजी खापणे, जनार्दन दिंडे, जयंत आसगावकर, भरत रसाळे, एस. एन. मस्कर, राजेश वरक, के. के. पाटील, आदी उपस्थित होते. मच्छिंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजू मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राम कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांकडून बुलेट
या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष मस्कर यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांना बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतर्फे ‘बुलेट’ प्रदान करण्यात आली. तिची चावी जगदाळे यांना वैजनाथ चाटे, संतराम मुंडे, विकास टेकाळे यांच्या हस्ते देण्यात आली.

Web Title: Do not be satisfied with twenty percent subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.