अजितदादांकडून कानपिचक्या

By admin | Published: July 3, 2017 12:50 AM2017-07-03T00:50:30+5:302017-07-03T00:50:30+5:30

अजितदादांकडून कानपिचक्या

Do not know from Ajitadad | अजितदादांकडून कानपिचक्या

अजितदादांकडून कानपिचक्या

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महिन्याभरात पक्षाची जिल्ह्णासह तालुकानिहाय कार्यकारिणी झाली पाहिजे... चांगली कामगिरी न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना घरी बसवणार... पक्षात कुणाचीही मक्तेदारी नाही, हे लक्षात घ्या... गटातटांचे राजकारण न करता पक्षविस्ताराचे काम करा... पदाचा वापर स्वत:च्या हिस्सेदारीसाठी करू नका... आमदाराचा पुतण्या, पुढाऱ्यांचा मुलगा म्हणून संघटनेत पदे देऊ नका... अशा कानपिचक्या देत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचे दोन खासदार व दहा आमदार निवडून आले पाहिजेत, यासाठी तयारीला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.
ताराबाई पार्कातील शासकीय विश्रामगृह येथील छत्रपती शाहू सभागृहात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत तालुकाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रदेश युवक उपाध्यक्ष, शहर युवक अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून अजितदादा पवार यांनी आढावा घेतला. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रदेश युवक उपाध्यक्ष आदिल फरास, शहर युवक अध्यक्ष अमोल माने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अवधूत अपराध यांच्यासह तालुकाध्यक्षांनी आपल्या पक्षसंघटनेतील कामांची माहिती दिली. काही ठिकाणी कार्यकारिणी अपूर्ण आहे, काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांची निवड झालेली नाही; तसेच पक्षांतर्गत गटबाजीही यावेळी समोर आल्याने अजितदादांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कानपिचक्या दिल्या.
संघटनेत पदे देताना पक्षाच्या आमदाराचा पुतण्या, पुढाऱ्याचा मुलगा घेऊन जागा अडवू नका. त्यांच्यात योग्यता व पात्रता असेल तर विचार होऊ शकतो. अजितदादा पवार म्हणाले, येणाऱ्या काळात जिल्ह्णात दोन खासदार व दहा आमदार हे राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच निवडून आले पाहिजेत. कुठल्या पक्षाशी आघाडी होईल हे न पाहता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
सुनील तटकरे म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलो. सध्याचे राज्यकर्ते हे फक्त घोषणाच करीत असून त्याची अंमलबजावणी करीत नाहीत.
गटबाजी उघड
बैठकीत मुश्रीफ व महाडिक यांच्यातील गटबाजी दिसून आली. कार्यकर्त्यांच्या भाषणातून हे दिसून आले. यावर अजितदादा व सुनील तटकरे यांनी गटबाजीमध्ये न अडकता पक्षविस्तार महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
शाखांच्या फलकांवर
स्वत:चे फोटो लावू नका
गावागावांत पक्षशाखा काढून फलक लावा. या फलकांवर स्वत:चे फोटो लावण्यापेक्षा पक्षाध्यक्षांचा फोटो लावा. तरीही त्यांच्यापेक्षा तुम्हाला तुमचाच फोटो महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्हालाच राष्ट्रीय अध्यक्ष करतो, असे अजितदादांनी म्हणताच हास्याचे फवारे उडाले.
जिल्ह्यातील नेत्यांचे आमच्याकडे जास्तच लक्ष आहे
जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने यांनी जिल्ह्णातील नेत्यांचे
आमच्याकडे जरा जास्तच लक्ष असल्याने कागलमध्ये घरकुलाबाबत मोर्चे काढून आमदार मुश्रीफांसह आम्हाला राजकारणातून संपविण्याची भाषा केली जात आहे. यावर आम्ही प्रतिमोर्चा काढून लढाई सुरू ठेवल्याचे सांगितले. यावर हल्ले हे शक्तिस्थळांवरच होत असतात. देशपातळीवर शरद पवार यांच्यावरही असे हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आपण ते परतवून लावले पाहिजेत, असे अजितदादांनी सांगितले.
धनंजय महाडिक हीच राष्ट्रवादीची ‘दक्षिणे’तील ताकद
राष्ट्रवादीचे ‘कोल्हापूर दक्षिण’चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कोेल्हापूर दक्षिण मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक व माजी मंत्री आमदार सतेज पाटील अशा दोन ताकदी असून, या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचे चांगल्या प्रकारे काम केल्याचे सांगितले. हा धागा पकडत सुनील तटकरे यांनी धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असल्याने त्यांची ताकद ही राष्ट्रवादीचीच असून, यामध्ये दुमत असण्याचे कारण नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
व्यासपीठावर खा. महाडिक आहेत, हे लक्षात घ्या
राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष आदिल फरास यांनी आपल्या भाषणावेळी व्यासपीठावरील सर्व नेत्यांची नावे घेतली. यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांचे नाव घ्यायला ते विसरले. यावर अजितदादांनी ‘व्यासपीठावर खासदार महाडिक आहेत, हे लक्षात असू द्या,’ अशी चूक फरास यांच्या लक्षात आणून देत ठणकावले.

Web Title: Do not know from Ajitadad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.