आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:21 AM2018-07-25T00:21:21+5:302018-07-25T00:21:50+5:30

Do not let anyone loose !: Nathani Daveri Gosavi community alert | आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

आता कुणाला ढिलं सोडायचं नाही!: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इशारा

Next


कोल्हापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय असताना, चोर समजून आमच्या बांधवांची अमानुष हत्या करण्यात आली. आता यापुढं कुणाला ढिलं सोडायचं नाही, असा आक्रमक इशारा नाथपंथी डवरी गोसावी समाजाने मोर्चाद्वारे दिला.
राईनपाडा येथे झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दुपारी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी हा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
दसरा चौकातून घोषणा देत मोर्चाला सुरुवात झाली. ‘नाथपंथी गोसावी समाजावर अन्याय करणाऱ्या राक्षसांना फाशी द्या,’ अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. व्हीनस कॉर्नरवर मोर्चेकºयांनी रस्त्यात ठिय्या मारल्याने वाहतूक ठप्प झाली. असेंब्ली रोडवर झालेल्या सभेत मोर्चाचे प्रमुख संयोजक अनिल शिंदे म्हणाले, मूळ गावापासून शेकडो किलोमीटरवर धुळे जिल्ह्यात आमचे बांधव गेले असताना त्यांना बेदम मारहाण झाली. ते स्वत:ची ओळख सांगत असताना ते ऐकून न घेता चोर समजून त्यांना मरेपर्यंत मारहाण केली. शासनाने संबंधितांच्या परिवाराला १0 लाख दिले, पोलिसांनी ३२ जणांना अटक केली. मात्र एवढ्यावर आमचे समाधान नाही. या दोषींवर कडक कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
दादा जगताप म्हणाले, गावा-गावांत आमच्याकडे वाकड्या नजरेने बघणाºयांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एकजूट दाखविण्याची गरज आहे.
जे. के. माळी म्हणाले, शेकडो वर्षे आम्ही पारंपरिक व्यवसाय करीत असताना आमची जात गुन्हेगारी नाही. ज्यांना मारण्यात आले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करणार आहोत. जनाबाई चौगुले (जयसिंगपूर) म्हणाल्या, कुत्र्याला मारतानासुद्धा त्याचा जीव जाण्याइतपत आपण मारत नाही. मात्र इथं तर आमच्या बांधवांना ठार मारलं. आता सरकारनं ज्यांनी मारलं त्यांना फाशी देण्याचा हुकूम द्यावा.
यावेळी दादा जगताप, राम साळुंखे, अशोक शिंदे (शिराळा), ईश्वर शिंदे, गजाबाई शिंदे, अण्णा शिंदे, डॉ. माळी, रमेश रुकडीकर, बाजीराव नाईक यांची भाषणे झाली. जगन्नाथ माळवे, आदिनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, प्रा. डॉ. डी. आर. भोसले यांनी तहसीलदार गुरू बिराजदार यांना निवेदन दिले.

Web Title: Do not let anyone loose !: Nathani Daveri Gosavi community alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.