जात-धर्म बघून प्रेम करू नका; इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून कोल्हापुरात प्रेमी युगुलाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 01:53 PM2023-09-02T13:53:33+5:302023-09-02T13:54:22+5:30

शिरोली : शिरोली येथील प्रेमी युगुलाने एकत्रीत जीवन संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला. दोघांच्या घरातून प्रेमास विरोध होत असल्याने या ...

Do not love caste-religion, all are not the same; Lovers ended their lives in Kolhapur by posting a story on Instagram | जात-धर्म बघून प्रेम करू नका; इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून कोल्हापुरात प्रेमी युगुलाने संपवले जीवन

जात-धर्म बघून प्रेम करू नका; इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून कोल्हापुरात प्रेमी युगुलाने संपवले जीवन

googlenewsNext

शिरोली : शिरोली येथील प्रेमी युगुलाने एकत्रीत जीवन संपवल्याने कोल्हापूर जिल्हा हादरला. दोघांच्या घरातून प्रेमास विरोध होत असल्याने या प्रेमी युगुलाने नायलॉन दोरीने गळफास घेवून जीवन संपवले. धक्कादायक बाब म्हणजे मृत दोघेही अल्पवयीन होते. शिरोली (ता. हातकणंगले) येथे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार मृत १८ वर्षीय मुलगा व १७ वर्षीय मुलगी एकाच गल्लीत राहत होते. या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबध होते. पण त्यास दोन्ही कुटुंबीयांकडून विरोध होता. दोघांना परस्पर कुटुंबीयांनी समज दिली होती. त्यामुळे आपल्या प्रेमास विरोध असून आपला विवाह होणार नाही, या भावनेतून शुक्रवारी रात्री मुलगी बाहेर पडली होती. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. 

मुलगी रात्री प्रियकर मुलाच्या घरी गेली आणि तिथेच दोघांनी घरातील लोंखडी पाईपला नायलॉनच्या दोरीने जीवन संपवले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या प्रकाराने शिरोली परिसरात खळबळ उडाली. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवून आत्महत्या...

ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार आहे. प्रेम करताना त्याची जात-धर्म बघून प्रेम करू नका. कारण सगळीच सारखे नसतात. असे प्रेमी युवलानी आपल्या इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवत आत्महत्या केली. एकाच दोरीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.

Web Title: Do not love caste-religion, all are not the same; Lovers ended their lives in Kolhapur by posting a story on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.