आमजाई व्हरवडेतील त्या अंगणवाडीत विद्यार्थी बसवू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:00+5:302021-04-10T04:24:00+5:30
आमजाई व्हरवडे : येथील धोकादायक अंगणवाडी इमारतीला राधानगरी महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी यांनी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तत्काळ भेट ...
आमजाई व्हरवडे : येथील धोकादायक अंगणवाडी इमारतीला राधानगरी महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी यांनी लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तत्काळ भेट देऊन पाहणी करत या अंगणवाडीत आगामी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवू नये, असे आदेश दिले. तसेच अंगणवाडीची नवीन इमारत होईपर्यत भाड्याच्या जागेत विद्यार्थ्यांची सोय करण्याच्या सूचना राधानगरी पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाच्या अधिकारी शीतल पाटील यांनी दिले.
आमजाई व्हरवडे येथील मरगुबाई मंदिराशेजारी असणारी अंगणवाडीची इमारत धोकादायक बनली आहे पावसाळ्यात तर या इमारतीत पाणी साचते त्यामुळे पावसाळ्यात कोणत्याही क्षणी ही इमारत पडू शकते याबाबत चार दिवसांपूर्वी लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी होत इमारतीला भेट देऊन पाहणी केली यावेळी सरपंच आनंदराव काबळे उपसरपंच रुपाली चौगले माजी उपसरपंच संदीप पाटील, बिराज काबळे, गुरुनाथ पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.दरम्यान या इमारतीला वीस वर्षे पूर्ण न झाल्याने निर्लीकिकरण करण्यात अडचणी येत आहेत. या इमारतीचे बांधकाम २००३ ला झाले आहे पण अशा धोकादायक इमारतीना हा नियम शिथिल करणे गरजेचे आहे.
.......
कोट
आमजाई व्हरवडे येथील अंगणवाडीची इमारत धोकादायक बनली हे खरे आहे, पण वीस वर्षे पूर्ण न झाल्याने ही इमारत निर्लीकिकरण करण्यास अडचणी येऊ शकतात, पण आगामी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या इमारतीत न बसवता एखाद्या चांगल्या इमारतीत बसवण्याची व्यवस्था केली जाईल त्या इमारतीचे भाडे शासन देणार आहे
शीतल पाटील
महिला बालकल्याण विकास अधिकारी