अर्थिंगशिवाय वीज यंत्रणेची दुरुस्ती नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:14 AM2021-02-05T07:14:47+5:302021-02-05T07:14:47+5:30

(वितरण संबंधित आहे. चांगली वापरावी : विश्वासपाटील) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विद्युतीकरणाचे काम करताना अर्थिंग हा प्राणवायू आहे, ...

Do not repair the electrical system without earthing | अर्थिंगशिवाय वीज यंत्रणेची दुरुस्ती नको

अर्थिंगशिवाय वीज यंत्रणेची दुरुस्ती नको

Next

(वितरण संबंधित आहे. चांगली वापरावी : विश्वासपाटील)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विद्युतीकरणाचे काम करताना अर्थिंग हा प्राणवायू आहे, तेव्हा अर्थिंग करूनच वीजक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विद्युत यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करावे, असा सल्ला कोल्हापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी बुधवारी दिला.

कोगे (ता. करवीर) कक्षातील कर्मचारी व कुटुंबीयांसाठी आयोजित विद्युत सुरक्षा कार्यशाळेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, महावितरणसाठी प्रत्येक कर्मचारी हा संसाधन आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे, याची जाणीव ठेवून विद्युत कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करूनच काम करावे.

यावेळी साहाय्यक अभियंता रश्मी पाटील यांनीही विद्युत सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी संदीप बाणदार, विशाल चव्हाण, विश्वजित नाईक, प्रकाश चौगुले, स्नेहल सुतार यांची उपस्थिती होती. कनिष्ठ अभियंता आर. एस. कांबळे यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्रधान तंत्रज्ञ एम. ए. वेदांते यांनी आभार मानले.

फोटो ०३०२२०२१-कोल-एमएसईबी वर्कशॉप (दुकॉलमी वापरावा.)

कोगे (ता करवीर) येथे झालेल्या महावितरणच्या कर्मचारी व कुटुंबीयांसाठी आयोजित विद्युत सुरक्षा कार्यशाळेत कार्यकारी अभियंता दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Do not repair the electrical system without earthing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.