साखर कारखानदारीचा अभ्यास नसणाºयांनी बोलू नये - के. पी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 07:14 PM2017-10-06T19:14:26+5:302017-10-06T19:14:26+5:30

सरवडे : ज्यांना सहकार व साखर कारखानदारीचा अभ्यास नाही, अशी मंडळी आमच्या कारभारावर टीका करीत आहेत

Do not talk about sugar factories - K. P. Patil | साखर कारखानदारीचा अभ्यास नसणाºयांनी बोलू नये - के. पी. पाटील

साखर कारखानदारीचा अभ्यास नसणाºयांनी बोलू नये - के. पी. पाटील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : ज्यांना सहकार व साखर कारखानदारीचा अभ्यास नाही, अशी मंडळी आमच्या कारभारावर टीका करीत आहेत. खोटी पत्रके काढून सभासदांची दिशाभूल करता येत नाही, असा टोला माजी आमदार के. पी. पाटील यांनी हाणला.

पनोरी (ता. राधानगरी) येथे महालक्ष्मी विकास आघाडीच्या प्रचारार्थ शुक्रवारी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्ञानदेव पुंगावकर होते. के. पी. पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांत अनेक कठीण परिस्थितीत व विरोधकांच्या कुरघोड्यांना तोंड देत ‘बिद्री’ला प्रगतिपथावर नेले आहे. सहवीज प्रकल्प उभारून वीज विक्रीचा उच्चांक केला. याउलट विरोधकांनी कारखान्याची प्रगती कशी थांबेल, असाच प्रयत्न केला. अशा प्रवृत्तीला सभासद हद्दपार करतील. ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, सहवीज प्रकल्प उभा राहिला म्हणूनच ‘बिद्री’ची प्रगती झाली. कोणत्याही चांगल्या कामाच्या मागे उभे राहण्याची आमची पद्धत आहे. त्यामुळेच के. पी. पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

भिकाजी एकल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार हसन मुश्रीफ, नामदेवराव भोईटे, राहुल देसाई, फिरोजखान पाटील, अनिल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी दिग्विजय चौगले, सुनील वाडकर, भगवान पातले, तानाजी पोवार, राजाराम पाटील, शिवाजी मांगले, मारुती तोडकर, राजाराम स. पाटील, के. डी चौगले, आनंदा पाटील, आदी उपस्थित होते. शशिकांत यांनी आभार मानले.

दिवाळीपूर्वी साखर देऊ
ऐन दिवाळीच्या तोंडावर सभासदांना अपात्र करून त्यांची साखर बंद केली; पण अपात्र सभासदांना दिवाळीपूर्वी साखर देऊ, हा माझा शब्द असल्याचे के. पी. पाटील यानी सांगितले.

 

 

Web Title: Do not talk about sugar factories - K. P. Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.