‘इको सेन्सिटीव्ह’मध्ये गगनबावडा तालुका नको--सतेज पाटील

By admin | Published: May 5, 2017 10:36 PM2017-05-05T22:36:50+5:302017-05-05T22:56:21+5:30

शिष्टमंडळाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Do not want Gaganbawada taluka in 'Echo Sensitiv' - Satej Patil | ‘इको सेन्सिटीव्ह’मध्ये गगनबावडा तालुका नको--सतेज पाटील

‘इको सेन्सिटीव्ह’मध्ये गगनबावडा तालुका नको--सतेज पाटील

Next

  कोल्हापूर : पश्चिम घाट परिसंवेदनशील (इको सेन्सिटीव्ह झोन) क्षेत्रामध्ये गगनबावडा तालुक्याचा समावेश करू नये, अशी मागणी शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गगनबावडा तालुक्यातील २१ गावांचा समावेश ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मध्ये करण्यात आलेला आहे. जिल्"ात गगनबावडा तालुका हा सर्वांत जास्त पर्जन्यमानाचे क्षेत्र असून या भागात ऊस, भात, नाचणी या पिकांचे प्रामुख्याने उत्पादन घेतले जाते. हा भाग दुर्गम असून ‘इको सेन्सिटीव्ह झोन’मुळे येथील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा. या झोनमध्ये येणाऱ्या निवडे, वेसर्डे, तळये बुद्रुक, खोकुर्ले ही गावे उंच टेकडीवर असून येथे जंगल परिसर नाही. कोदे खुर्द व कोदे बुद्रुक या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असून हे गाव प्रकल्पग्रस्त आहे. गावातील १५० एकर जमीन तलावासाठी गेली आहे. मणदूर, कातळी, मांडुकली, तळये खुर्द या गावांच्या जवळपास जंगल परिसर नाही. अणदूर गावात लघु पाटबंधारे तलाव असून त्यामध्ये २८० एकर जमीन पाण्यामध्ये गेली आहे. सांगशी व सैतवडे या दोन्ही गावची ग्रामपंचायत एकच असून ही गावे वाड्या-वस्त्यांमध्ये विखुरली आहेत. नरवेली गावामध्ये लघु पाटबंधारे प्रकल्प आहे. हे गाव पुनर्वसनामध्ये गेले असल्याने जवळपास जंगल परिसर नाही. बोरबेट, गारिवडे, बावेली, कडवे, शेळोशी, धुंदवडे, जर्गी या गावांच्या शेजारील राही गावामध्ये मध्यम प्रकल्प चालू असल्यामुळे ही गावे वगळण्यात यावीत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, गगनबावडा पंचायत समिती सभापती मंगल कांबळे, उपसभापती पांडुरंग भोसले, चंद्रकांत खानविलकर, बयाजी शेळके, बंडा पडवळ, महादेव पडवळ, गजानन चौधरी, सर्जेराव चौधरी, पांडुरंग खाडे, लहू पाटील आदी उपस्थित होते. ---------------------------------------- फोटो : ०५०५२०१७-कोल-गगनबावडा फोटो ओळी : ‘इको सेन्सिटीव्ह’झोनमध्ये गगनबावडा तालुक्याचा समावेश करू नये, या मागणीचे निवेदन शुक्रवारी आमदार सतेज पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील, भगवान पाटील, मंगल कांबळे आदी उपस्थित होते. -

Web Title: Do not want Gaganbawada taluka in 'Echo Sensitiv' - Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.