निवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ?: अमल महाडिक यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 01:56 PM2019-05-07T13:56:23+5:302019-05-07T13:57:24+5:30

बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

Do you remember the question of water quality in the face of elections ?: Amal Mahadik's question | निवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ?: अमल महाडिक यांचा सवाल

निवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ?: अमल महाडिक यांचा सवाल

Next
ठळक मुद्देनिवडणुकीच्या तोंडावर पाचगावच्या पाणीप्रश्नाची आठवण का ? अमल महाडिक यांचा सवाल

कोल्हापूर : बारा वर्षे आमदार आणि त्यातील तीन वर्षे मंत्री असताना पाचगावच्या पाणीप्रश्न ज्यांना सोडविता आला नाही, त्यांना निवडणुकीच्या तोंडवरच हा प्रश्न कसा आठवला, असा सवाल आमदार अमल महाडिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

निवेदनात म्हटले आहे, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये बैठक घेऊन पाचगावसाठी पाच कोटी तीन लाख रुपये मंजूर करून आणले. त्यातून शिक्षक कॉलनीत साडेतीन लाख लिटरची पाणी टाकी उभी केली. उजळाईवाडीतून चित्रनगरीला आणि तिथून पाचगावला नव्या पाईपलाईनद्वारे पाणी नेले. २६ जानेवारी २०१६ पासून पाचगावला रोज १४ लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. याव्यतिरिक्त ज्या कॉलनी आणि वस्तींना पाणीपुरवठा होत नाही, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि नियोजन समितीमधून काम मंजूर झाले आहे.

खास बाब म्हणून टंचाई निधीतून दहा कोटी ५३ लाख रुपये मंजूर करून घेतले असून, यातून गळकी पाईप बदलणे, जलशुद्धिकरण, पंप बदलणे ही कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत २०२ कोटी ८८ लाख रुपये मंजूर केले असून, यातून गांधीनगरजवळील १३ गावे आणि नवीन ७ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

या सर्व परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असताना नंदगावमधून पाणी आणण्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप महाडिक यांनी केला आहे. ही योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याची कुणकुण लागल्यानेच श्रेय घेण्यासाठी ही संबंधितांची धडपड असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पाचगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मी आणि माझे शासन बांधील आहे. केवळ पाचगावसाठी १६०० मीटरची पाईपलाईन टाकली जाणार आहे. मात्र, ही कामे आपण मंजूर केल्याचे भासवून श्रेय लाटण्याचा उद्योग बंद करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

तुमचे कर्तृत्व माहिती आहे

पाचगाव, गांधीनगरच्या पाणी योजनांसाठी काय केले याची माहिती देताना आमदार अमल महाडिक यांनी नाव न घेता आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे. आयआरबी प्रकल्प आणि अपुरी थेट पाईपलाईन योजना हे तुमचे कर्तृत्व सर्वांना माहिती आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
 

 

Web Title: Do you remember the question of water quality in the face of elections ?: Amal Mahadik's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.