पाहिलंत का ? रद्दीतील रंगीत तुुकड्यांपासून रंग न वापरता केल्यात नेत्रदीपक ‘कोलाज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:29 AM2018-11-12T11:29:30+5:302018-11-12T11:35:40+5:30
अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्शन शनिवारपर्यंत खुले राहणार आहे.
कोल्हापूर : अशोक ओऊळकर यांचे ‘कोलाज’ चित्रपद्रर्शन शाहू स्मारक भवनात खुले झाले. कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून एकापेक्षा एक नेत्रदीपक चित्रे तयार केली आहेत. ती पाहण्यासाठी गर्दी झाली असून, हे चित्रप्रदर्शन शनिवारपर्यंत खुले राहणार आहे.
रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत.
चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार अशोक वडणगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक ओऊळकर म्हणाले, नारायण हजेरी यांच्यापासून प्रेरणा घेऊन ‘कोलाज’ चित्रे तयार करण्यास सुरुवात केली. ही चित्रे तयार करण्यासाठी खूप वेळ लागत असल्याने सेवानिवृत्तीनंतर त्याकडे अधिक लक्ष दिले.
रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत.
१९९० पासून आतापर्यंत १२५ कलाकृती तयार केल्या आहेत. या चित्रांसाठी कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकांतील रंगीत तुकडे जोडून कलाकृती तयार केल्या आहेत.
रंग न वापरता ओऊळकर यांनी अशा कलाकृती तयार केल्या आहेत.
ओऊळकर यांच्या कष्टाचे कौतुक करीत अशोक वडणगेकर म्हणाले, अशा प्रकारच्या कलाकृती तयार करणे किचकट व तितकेच त्रासदायक काम आहे. तरीही अशोक ओऊळकर यांनी प्रचंड मेहनतीतून निर्माण केलेल्या या कलाकृती प्रेरणादायी ठरतील.
यावेळी मोहन वडणगेकर, दिनेश ओऊळकर, नारायण हजेरी, आदी उपस्थित होते. दरम्यान, पहिल्या दिवसापासूनच अतिशय आकर्षक कलाकृती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. एकापेक्षा एक अशा कलाकृतीचे नमुने येथे पाहावयास मिळतात.