नियमांचे पालन करून आपले व्यवसाय करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:47+5:302021-02-20T05:03:47+5:30

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता, कोरोनाची दुसरी लाट कोल्हापुरात येऊ नये ...

Do your business by following the rules | नियमांचे पालन करून आपले व्यवसाय करावे

नियमांचे पालन करून आपले व्यवसाय करावे

Next

कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेता, कोरोनाची दुसरी लाट कोल्हापुरात येऊ नये म्हणून आत्तापासूनच काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त निखिल मोरे यांनी गुरुवारी केले.

चेंबर ऑफ कॉमर्स, कापड व्यापारी संघ, हॉटेल मालक संघ, इलेक्ट्रिक असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, किरकोळ दुकानदार संघटना व इतर व्यापारी संघटना यांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केले.

अनलॉक झाल्यानंतर सर्व ठिकाणी व्यवसाय सुरू झाले आहेत. परंतु कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेमध्ये शिथिलता आली असून, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, भाजी मार्केट याठिकाणी मास्क न वापरणे, वाहन चालवताना अर्धवट मास्क लावणे व गर्दी करून सोशल डिस्टंन्सचे पालन न करणे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ नये, यासाठी नियमांचे पालन करून सर्व व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे मोरे म्हणाले.

व्यापाऱ्यांना नो मास्क, नो एन्ट्री अशी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात येतील, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे सांगितले. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांचे बुकिंग झालेले आहेत, त्याठिकाणी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी ग्वाही मंगल कार्यालय असोसिएशनचे नितीन सावंत यांनी दिली.

यावेळी परवाना अधीक्षक राम काटकर, मुख्य अग्निशनम अधिकारी रणजित चिले, उज्वल नागेशकर, सिध्दार्थ लाटकर, सचिन शानभाग, गौरी इंगळे, अरुण चोपदार, अनिल धडाम, डी मार्टचे ऋषिकेश देवाडे, राहुल नष्टे, अजित कोठारी, जयंत गोयंका, गणेश काटे, कैलास साळोंखे, उमेश देसाई, प्रकाश कल्याणकर, शैलेश शिंदे, उदय इंगळे, संपत पाटील, संदीप वीर, कुशल राक्षे, दिलीप पोवार, गोरख गुरव, राजेंद्र वाडकर उपस्थित होते.

(फोटो देत आहे -केएमसी या नावाने)

Web Title: Do your business by following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.