तुमचे मुलांकडे लक्ष आहे का?

By admin | Published: September 6, 2014 12:35 AM2014-09-06T00:35:55+5:302014-09-06T00:35:55+5:30

आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते.

Do your children pay attention? | तुमचे मुलांकडे लक्ष आहे का?

तुमचे मुलांकडे लक्ष आहे का?

Next
पुणो : आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वस्तू दिल्या, त्यांची हौस पूर्ण केली, दज्रेदार शिक्षण दिले, की आपली जबाबदारी पूर्ण झाली, अशी एक मानसिकता पालकांची असते. मात्र, मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणो आणि त्यांच्या जीवनास योग्य दिशा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणो गरजेचे असते. आपण दिलेली मोकळीक, पैसा, अन्य काही सुविधा आपले पाल्य कशासाठी सत्कारणी लावत आहेत, हे पाहणोही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा, मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशी किती तरी उदाहरणो आपल्याला समाजात घडताना दिसतात. पण, त्याचे गांभीर्य ‘रेगे’ या चित्रपटाने उलगडले. 
‘लोकमत सखी मंच’च्या वतीने सिटी टॉकीजमध्ये सखी सदस्यांना ‘रेगे’ हा चित्रपट दाखविण्यात आला. रवी जाधव प्रस्तुत आणि अभिजित पानसे दिग्दर्शित या चित्रपटाने मुलांचे संगोपन ही गोष्ट पालकांनी गंभीरपणो घ्यावी आणि मुलांनीही वेळीच संभाव्य धोके कसे ओळखावेत, याचेच जणू धडेच दिले आहेत.  
या शोला सखी मंचच्या सदस्यांनी  हाऊसफुल्ल प्रतिसाद दिला.  
(प्रतिनिधी)
 
 आपल्या पाल्यास दज्रेदार शिक्षण मिळावे म्हणून आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पण, या शिक्षणासोबत त्यांच्या अवतीभोवतीचे वातावरण कसे आहे? तो किंवा ती कोणत्या मित्र-मैत्रिणींमध्ये राहते? हे पाहणो पालकांचे कर्तव्य आहे. आणि जर पालकांनी तसे केले नाही, तर पाल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते, याचे कथन या चित्रपटाच्या निमित्ताने केले आहे.  
- रवी जाधव
 
हा चित्रपट म्हणजे एक भयानक सत्य आहे. आपल्या मुलांकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही, तर कशाचा सामना करावा लागेल, याबद्दल फार सुंदर रीतीने रवी जाधव यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
- कुंदा शेलार 
या चित्रपटाचा शेवट फार भयानक आहे. पण, असेही होऊ शकते, याचा विचार कधी केला नव्हता. या चित्रपटाच्या निमित्ताने या मुलांच्या संगतीबद्दल नव्याने विचार झाला पाहिजे. - वर्षा नेहरकर
वाईट संगतीचे परिणाम किती वाईट असू शकतात, हे कळले.
- संजीवनी उन्हाळे

 

Web Title: Do your children pay attention?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.