गर्भलिंग निदानासाठी २० हजार घेताना डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:47+5:302020-12-17T04:49:47+5:30
कोडोली : येथील मातृसेवा रुग्णालयाचे डॉ. अरविंद कांबळे याला गर्भनिदान करण्यासाठी २० हजार रुपये घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी ...
कोडोली : येथील मातृसेवा रुग्णालयाचे डॉ. अरविंद कांबळे याला गर्भनिदान करण्यासाठी २० हजार रुपये घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी स्टिंग ऑपरेशन करून रंगेहात पकडले.
अरविंद कांबळे याच्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केले जात असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासून या हॉस्पिटलमध्ये एक स्टिंग ऑपरेशन राबवले. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अरविंद कांबळे हा डॉक्टर अलगदपणे जाळ्यात सापडला. त्याने सोनोग्राफीसाठी २० हजार रुपये घेतल्याचेही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे २०१७ साली हा डॉक्टर गर्भलिंग निदान करीत असल्याचे उघड झाले होते. कारवाईनंतरही सोनोग्राफी मशीनचे सील काढून डॉ. कांबळे याने गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा सुरूच ठेवला होता.