जखमी घारीच्या पंखाला डॉक्टरांचे बळ, शस्त्रक्रियेनंतर घेतली आकाशात झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:20+5:302021-04-07T04:24:20+5:30
कोल्हापूर : आकाशात विहार करताना पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी झालेल्या एका पूर्ण वाढीच्या घारीच्या तुटलेल्या पंखांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून ...
कोल्हापूर : आकाशात विहार करताना पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी झालेल्या एका पूर्ण वाढीच्या घारीच्या तुटलेल्या पंखांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला वन विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवदान दिले. घारीच्या पंखांचे हाड जोडण्यासाठी रॉड घालून शस्त्रक्रिया करण्याचा हा कदाचीतच पहिलाच प्रयोग असेल. या पक्षीमित्रांनी चार महिने शुश्रूषा केल्यानंतर या घारीने आकाशात मुक्तपणे झेप घेतली.
कोल्हापुरातील पक्षीमित्र गणेश कदम यांना २८ नोव्हेंबर २०२० मध्ये एक घार पतंगाच्या मांज्यात अडकून जखमी झालेली आढळली होती. दोन्ही पंख तुटल्यामुळे या घारीला उडता येत नव्हते, त्यामुळे तिचे प्राण धोक्यात आले होते. यामुळे गणेश कदम यांनी ही घार वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्या क्लिनिकमध्ये आणली.
वाळवेकर आणि त्यांचे सहकारी समर्थ यांनी या घारीला चारापाणी घातले आणि दर पंधरा दिवसांनी तिच्यावर उपचार सुरू केले. तीन महिन्यांच्या उपचारानंतर घारीच्या पंखांच्या हालचाली वाढल्या. त्यानंतर पंखांचे हाड जोडण्यासाठी त्याला रॉड जोडून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली, हा कदाचीत पहिलाच प्रयोग असावा. तो यशस्वी झाल्यानंतर या घारीला गणेश कदम आणि डॉ. वाळवेकर यांनी २५ मार्च २०२१ रोजी रंकाळ्यावरील नैसर्गिक अधिवासात सोडले.
----------------------------------------------
(संदीप आडनाईक)
फोटो : 06042021-Kol-ghar
फोटो ओळी : कोल्हापुरातील पक्षीमित्र गणेश कदम यांनी चार महिने शुश्रूषा केल्यानंतर जखमी घारीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
06042021-Kol-ghar01
फोटो ओळी : वन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी तुटलेल्या पंखाचे हाड जोडून घारीला जीवदान दिले.
===Photopath===
060421\06kol_1_06042021_5.jpg~060421\06kol_2_06042021_5.jpg
===Caption===
फोटो : 06042021-Kol-gharफोटो ओळी : कोल्हापूरातील पक्षीमित्र गणेश कदम यांनी चार महिने शुश्रूषा केल्यानंतर जखमी घारीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.~06042021-Kol-ghar01फोटो ओळी : वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी तुटलेल्या पंखाचे हाड जोडून घारीला जीवदान दिले.