डॉक्टर, मेडिकल दुकानदारांनी कोविड रुग्णांची नोंद ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:17 AM2021-07-20T04:17:52+5:302021-07-20T04:17:52+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या, कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवावी. मेडिकल दुकानदारांनीही लक्षणे ...

Doctors, medical shopkeepers should keep a record of Kovid patients | डॉक्टर, मेडिकल दुकानदारांनी कोविड रुग्णांची नोंद ठेवावी

डॉक्टर, मेडिकल दुकानदारांनी कोविड रुग्णांची नोंद ठेवावी

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या, कोविड लक्षणे असणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवावी. मेडिकल दुकानदारांनीही लक्षणे असणाऱ्या रुग्णांना औषध देताना औषध वाटप वहीत नोंद करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी दिले.

खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास असलेली व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर औषध दुकानदाराकडे औषध मागत असेल तर दुकानदाराने त्याला डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून औषध घ्यायला सांगावे. तसेच मेडिकल दुकानदारांनी लक्षणे असणारी व्यक्ती औषध घेण्यास आल्यास त्यांनी त्यांच्या नोंदवहीत नोंद करून ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याच्या सूचना द्याव्यात. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत. औषध दुकानदार यांच्या नोंदवहीतील माहिती रोज गोळा करण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल, असेही आदेशात म्हटले आहे.

--

Web Title: Doctors, medical shopkeepers should keep a record of Kovid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.