अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 17:19 IST2020-10-19T17:17:39+5:302020-10-19T17:19:14+5:30

Photography, award, kolhapur फोटो साऊथ एशिया व सम्यक दृष्टी यांच्यातर्फे देण्यात येणारा डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान येथील अभिजित गुर्जर यांना मिळाला आहे. मूर्ती नायक फौंडेशन, अमेरिका व फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट (मुंबई) यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. या सन्मानासाठी देशभरातून दहा फोटोग्राफरची निवड करण्यात आली. या छायाचित्रांचे इंडियन फोटो फ़ेस्टिव्हल, हैदराबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

Documentary Photographer's Grant Award to Abhijit Gurjar | अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान

अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान

ठळक मुद्दे अभिजित गुर्जर यांना डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मानसाउथ आफ्रिकेच्या निओ नत्सोमा यांनी केली विजेत्यांची घोषणा

कोल्हापूर : फोटो साऊथ एशिया व सम्यक दृष्टी यांच्यातर्फे देण्यात येणारा डॉक्युमेंटरी फोटोग्राफरचा ग्रँट सन्मान येथील अभिजित गुर्जर यांना मिळाला आहे. मूर्ती नायक फौंडेशन, अमेरिका व फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट (मुंबई) यांचे त्यासाठी सहकार्य लाभले. या सन्मानासाठी देशभरातून दहा फोटोग्राफरची निवड करण्यात आली. या छायाचित्रांचे इंडियन फोटो फ़ेस्टिव्हल, हैदराबाद येथे नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात साउथ आफ्रिकेच्या निओ नत्सोमा यांनी या विजेत्यांची घोषणा केली. गुर्जर हे व्यावसायिक असून आवड जोपासत त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या मार्गदर्शनाखाली ते फोटो जर्नालिझमचे शिक्षण घेत आहेत. द वॉल स्ट्रीट जर्नल, द टाइम लंडन, रॉयटर्स, एमएसएन, मोगाबे, द हिंदू, द वायर, चित्रलेखा, आदी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रकाशन संस्थांमधून त्यांचे लेख व फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
 

Web Title: Documentary Photographer's Grant Award to Abhijit Gurjar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.