माहितीपटातून कुसुमाग्रजांच्या चरित्रावर प्रकाशझोत - विविध उपक्रमांनी मराठी राजभाषा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:44 AM2021-02-28T04:44:59+5:302021-02-28T04:44:59+5:30
कोल्हापूर : वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या साहित्य आणि जीवनचरित्रावर तेजोमय शब्दब्रम्ह या माहितीपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ...
कोल्हापूर : वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या साहित्य आणि जीवनचरित्रावर तेजोमय शब्दब्रम्ह या माहितीपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून हा माहितीपट रसिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
या माहितीपटाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन व निवेदन निशांत गोंधळी यांचे असून संकलन व पार्श्वसंगीत तुषार दिवेकर यांचे आहे. पाच मिनिटांच्या या माहितीपटात वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मापासून ते कौटुंबीक पाश्वभूमी, त्यांच्या कविता, नाटके, साहित्य अशा विपुल संपदेची माहिती देण्यात आली आहे. तसेच ते स्वत: कविता सादर करीत असलेले काही व्हिडिओ, नटसम्राट नाटकातील काही प्रसंग, नामवंत कवींनी मांडलेले मत असा सर्वंकष आढावा या माहितीपटातून मांडला आहे.
--
विविध उपक्रमांनी अभिवादन
मराठी राजभाषा दिनानिमित्त शहरात विविध संस्था, शाळा महाविद्यालयांच्यावतीने साहित्य, सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले. शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक महावीर मुडबिद्रीकर यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बाळासाहेब कागले, प्रशांत दळवी, नंदा बनगे यांनी मनोगत व्यक्त केले. सहाशिव हाटवळ यांनी सूत्रसंचालन केले.
जयभारत हायस्कूल
मुख्याध्यापिका अश्विनी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिक्षक अरुण कुंभार यांनी कुसुमाग्रज यांची माहिती सांगितली. प्रमुख वक्ते बाजीराव माणगांवे यांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले. एम. वाय. निकाडे यांनी आभार मानले.
नागोजीराव पाटणकर हायस्कूल
मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. मराठी विभागप्रमुख एम. व्ही. रुकडीकर यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले. शिक्षक के. एम. साखरे व ए. आर. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. एच. आर. सत्रे यांनी आभार मानले.
विद्यापीठ हायस्कूल
मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिक्षक एस. व्ही. पाटील यांनी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, के. पी. वायफळकर, पर्यवेक्षिका ए. डी. कशाळकर उपस्थित होत्या.
--
पद्माराजे गर्लस हायस्कूल
मराठी विषय विभागप्रमुख एस. एस. इनामदार यांनी मातृभाषेचे महत्त्व विषद केले. शिक्षिका पी. जे. चव्हाण व विद्यार्थिनी तन्वी दळवी यांनी कथावाचन केले. एस. एस. गोणी यांनी कणा कवितेचे वाचन केले. श्रीजा कुलकर्णी हिने संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी मुख्याध्यापिका एस. आर. चौगले, उपमुख्याध्यापक एम. सी. जयकर, पर्यवेक्षक डी. के. गुरव, यू. आर. भेंडिगिरी उपस्थित होत्या. पी. एस पोवाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
---