कोविड सेंटर्ससाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:25 AM2021-05-21T04:25:26+5:302021-05-21T04:25:26+5:30
कोल्हापूर : शहरात खासगी रुग्णालयात अथवा इतर ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी अर्ज महापालिकेकडे प्राप्त होत असून अर्ज करताना ...
कोल्हापूर : शहरात खासगी रुग्णालयात अथवा इतर ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्यासाठी अर्ज महापालिकेकडे प्राप्त होत असून अर्ज करताना त्याठिकाणी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा याच्या माहितीच्या कागदपत्रासह महापालिकेकडे अर्ज करावा, असे आवाहन उपायुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्था ज्या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करणार आहे. त्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल, फायर व इलेक्ट्रिकचा ऑडिट अहवाल सादर करणे आवश्यक आहे. या सेंटरमध्ये नियुक्त केलेल्या डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफची नावानिशी यादी, सेंटरमध्ये आकारण्यात येणाऱ्या फी चा उल्लेख अथवा मोफत असल्यास तसा उल्लेख करावा. चहा, पाणी, नाश्ता व जेवणाची काय व्यवस्था आहे. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणार असाल तर त्याचाही ऑडिट रिपोर्ट, रुग्णांसाठी टॉयलेट ,बाथरूम व्यवस्था, उपलब्ध बेडची संख्या व यासह इतर सर्व व्यवस्था यांची माहिती अर्जासोबत द्यावी, असे मोरे यांनी म्हटले आहे.