कोणी लस देता का लस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:11 AM2021-05-04T04:11:03+5:302021-05-04T04:11:03+5:30

लसीचे दोन्ही डोस मी घेतले आहेत. त्यावेळचा अनुभव पाहता प्रशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी स्वतंत्र बूथ करावे. त्यांची आधारकार्ड नोंदणी ...

Does anyone get vaccinated? | कोणी लस देता का लस?

कोणी लस देता का लस?

Next

लसीचे दोन्ही डोस मी घेतले आहेत. त्यावेळचा अनुभव पाहता प्रशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी स्वतंत्र बूथ करावे. त्यांची आधारकार्ड नोंदणी करून त्यांच्यासाठी टोकन पद्धत राबवावी.

-रमेश पोवार, उत्तरेश्वर पेठ.

नोंदणी करून आणि रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. काहींना पहिला, तर काहींना दुसरा डोस घेण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसींचे समान वाटप करून लसीकरणाच्या प्रक्रियेत समतोल साधण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे.

- मगन पटेल, शिरोली.

शासनाकडून लसीचा मर्यादित पुरवठा होत असतानाही कोल्हापूरने लसीकरणात राज्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र, सध्या एकीकडे लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत असून दुसरीकडे लसींचा तुटवडा जाणवत आहे. जिल्हा प्रशासनाने पुरेशा लसींच्या उपलब्धतेसाठी शासनाकडे वेगाने पाठपुरावा करावा.

- लक्ष्मी पाटील, पाचगाव.

चौकट

लवकरच डोसचा प्रश्न मार्गी लागेल

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वर्षे अशा दोन गटामध्ये लसीकरणाची विभागणी होणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण जानेवारीपासून सुरू आहे. या वयोगटासाठी केंद्र शासनाकडून, तर १८ ते ४४ वयोगटाकरिता राज्य शासनाकडून लसींचा पुरवठा होईल. लस उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील लसीचा पहिला डोस, दुसऱ्या डोसचा प्रश्न या आठवड्यात लवकरच मार्गी लागेल, असे लसीकरण मोहिमेचे जिल्हा समन्वयक डॉ. फारूक देसाई यांनी सांगितले.

चौकट

चार महिन्यांत ५३ टक्क्यांचा पल्ला

कोल्हापूर जिल्ह्याने लसींच्या तुटवड्याशी सामना करत गेल्या चार महिन्यांमध्ये लसीकरणाच्या पहिल्या डोसचे ५३ टक्के, तर दुसऱ्या डोसचे ८ टक्के उद्दिष्टांचा पल्ला गाठला आहे.

फोटो (०३०५२०२१-कोल-लसीकरण फोटो ०१, ०२, ०३) : कोल्हापुरातील लाईन बझार (कसबा बावडा) येथील सेवा रुग्णालयात सोमवारी कोविड लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. (छाया: नसीर अत्तार)

===Photopath===

030521\03kol_2_03052021_5.jpg~030521\03kol_3_03052021_5.jpg~030521\03kol_4_03052021_5.jpg

===Caption===

फोटो (०३०५२०२१-कोल-लसीकरण फोटो ०१, ०२, ०३) : कोल्हापुरातील लाईन बझार (कसबा बावडा) येथील सेवा रूग्णालयात सोमवारी कोविड लस उपलब्ध नसल्याने  लसीकरण बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. (छाया: नसीर अत्तार) ~फोटो (०३०५२०२१-कोल-लसीकरण फोटो ०१, ०२, ०३) : कोल्हापुरातील लाईन बझार (कसबा बावडा) येथील सेवा रूग्णालयात सोमवारी कोविड लस उपलब्ध नसल्याने  लसीकरण बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. (छाया: नसीर अत्तार) ~फोटो (०३०५२०२१-कोल-लसीकरण फोटो ०१, ०२, ०३) : कोल्हापुरातील लाईन बझार (कसबा बावडा) येथील सेवा रूग्णालयात सोमवारी कोविड लस उपलब्ध नसल्याने  लसीकरण बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. (छाया: नसीर अत्तार)

Web Title: Does anyone get vaccinated?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.