‘डोग्रा’ने पटकावला छ. शिवाजीराजे चषक

By admin | Published: February 10, 2015 12:37 AM2015-02-10T00:37:05+5:302015-02-10T00:37:36+5:30

कसबा बावडा : गारवा संघास उपविजेतेपद

'Dogra' has won ShivajiRaje Cup | ‘डोग्रा’ने पटकावला छ. शिवाजीराजे चषक

‘डोग्रा’ने पटकावला छ. शिवाजीराजे चषक

Next

कसबा बावडा : येथील पॅव्हेलियन मैदानावर रविवारी विद्युत झोतात रंगलेल्या छत्रपती शिवाजीराजे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात डोग्रा स्पोर्टस्ने विजेतेपद पटकावले. विजेत्या डोग्रा स्पोर्टस् संघास रोख रु. ७७ हजार ७७७ व चषक ऋतुराज संजय पाटील व दत्ता पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गारवा स्पोर्टस्ला उपविजेतेपद मिळाले. त्यांना रोख रु. ४४ हजार ४४४ व चषक प्रदान करण्यात आला.अंतिम सामन्यास रात्री दहा वाजता सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल डोग्रा संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचे सलामीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर आलेल्या प्रवीण देसाई व मुन्ना शेख यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे १७ व २२ धावांची खेळी केली. या संघाने दमदार फलंदाजी करीत निर्धारित दहा षटकांत ६८ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना गारवा स्पोर्टस् संघाच्या अविनाश व अमोल यांनी सावध पवित्रा घेत खेळण्यास सुरुवात केली; पण त्यांचे फलंदाज टप्प्याटप्प्याने बाद होत गेल्याने संघावरील दडपण वाढत गेले. अखेर हा संघ निर्धारित षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ५६ धावाच करू शकला.अंतिम सामन्यासाठी मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. एल. ई. डी. लाईट, साऊंड सिस्टीम यामुळे मैदानावर आयपीएल सामन्यासारखा ज्वर चढला होता. विजयानंतर डोग्रा स्पोर्टस्च्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यावेळी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी करण्यात आली.या सामन्यावेळी शंकर पाटील, मोहन सालपे, अमीर मुल्लाणी, जुबेर जमादार, सुशील रणदिवे, करण सोनवणे, जयसिंग ठाणेकर, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली. सामना समितीचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Dogra' has won ShivajiRaje Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.