शहरातून डॉल्बी हद्दपार होणार
By admin | Published: September 16, 2015 01:13 AM2015-09-16T01:13:30+5:302015-09-16T01:13:30+5:30
गणेशोत्सव : कोल्हापुरातील ७८ मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलिसांचे आवाहन
कोल्हापूर : डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार मंगळवारी शहरातील तब्बल ७८ मंडळांनी केला आहे. चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे यंदा शहरातील गणेशोत्सवातून डॉल्बी हद्दपार होणार आहे. शहरातील महत्त्वाच्या चारही पोलीस ठाण्यांत स्वत:हून मंडळे डॉल्बी लावणार नसल्याची हमी देत आहेत.
शहर शिवसेना यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आठ मंडळांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांना, तर उर्वरित ७० मंडळांनी संबंधित पोलीस ठाण्याला कळविले आहे.
डॉल्बीच्या दणदणाटामुळे ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वृद्ध, हृदयविकारग्रस्त, बालके यांच्या आरोग्याला डॉल्बीचा आवाज घातक आहे. त्यामुळे यंदा पोलीस प्रशासन अधिकाधिक मंडळांनी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सामाजिक संघटनाही आवाहन करीत आहेत. त्याला प्रतिसाद देऊन मंडळे स्वत:हून डॉल्बीऐवजी पारंपरिक वाद्ये वाजविण्याचा निर्णय घेत आहेत. गणरायाचे आगमन जवळ येईल तसे डॉल्बीमुक्तीचा निर्णय घेणाऱ्या मंडळांची संख्या वाढते आहे.
मंगळवारी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या मंडळांची नावे अशी : गणेश, ईगल (राजारामपुरी बारावी गल्ली), गोकुळ (राजारामपुरी दहावी गल्ली), आदर्श (राजारामपुरी नववी गल्ली), जय शिवराय (राजारामपुरी चौथी गल्ली), पॅट्रियट (काटकर कॉलनी), चॅन्सलर, भगवा (दौलतनगर), पाटाकडील तालीम, बोडके गल्ली, सनगर, बजापराव माने, लेटेस्ट, दत्ताजीराव काशीद (मंगळवार पेठ), खंडोबा, महाकाली (शिवाजी पेठ), नाथा गोळे तालीम (लाड चौक), नंदी (रंकाळा टॉवर), जय शिवराय (लाड चौक), छत्रपती शिवाजी (शिवाजी चौक), रेसकोर्स महादेव (रेसकोर्स), प्रतापसिंह (काळकाई), राजे संभाजी (कोळेकर तिकटी), भाई ग्रुप (शाहू बँक), नवविकास (दैवज्ञ बोर्डिंग), चाणक्य (सिद्धाळा गार्डन), मंगळवार पेठ (मिरजकर तिकटी), पूल गल्ली (रविवार पेठ), दयावान, हिंदवी (शिवाजी पेठ), दिलबहार (रविवार पेठ), झुंजार (सानेगुरुजी), बालगोपाल (मंगळवार पेठ), कोब्रा, फिरंगाई, अर्जुन, गणेश, संतोष, एकता (गणेश कॉलनी), जासूद (जासूद गल्ली, मंगळवार पेठ), जुना बुधवार पेठ, संरक्षण (जोशी गल्ली, शुक्रवार पेठ), चांदणी चौक (रविवार पेठ), हाय कंमाडो (जुना बुधवार पेठ), क्रांतिवीर राजगुरू (डांगे गल्ली), न्यू सम्राट (शनिवार पेठ), सत्यनारायण (पद््मा चौक, शाहूपुरी), शिवशक्ती (फोर्ड कॉर्नर), साईबाब ग्रुप (रविवार पेठ), गणेश स्वराज्य (पेरीना कॉर्नर, लक्ष्मीपुरी), जय शिवराय (रविवार पेठ), महाराजा (शिवाजी पेठ), लाल चौक (पान लाईन लक्ष्मीपुरी), शिवाजी (शिवाजी चौक), स्वयंभू (लक्ष्मीपुरी), भगवा रक्षक (रविवार पेठ), मृत्युंजय (शनिवार पेठ), नरसोबा (डांगे गल्ली, जुना बुधवार पेठ), सोल्जर (तोरस्कर चौक), स्थानिक म्हेतर (रविवार पेठ), आर्मी (आंबेडकर गल्ली), मास्टर (तारा चेंबर्स, लक्ष्मीपुरी), भगवा ग्रुप (टायटन शोरूम), गणेश, सी वार्ड (साळी गल्ली, सोमवार पेठ), दसरा चौक (साधना कॅपेसमोर लक्ष्मीपुरी), अष्टविनायक (पोस्टर गल्ली, शनिवार पेठ), शिपुगडे (बुधवार पेठ), रणझुंजार (परीट गल्ली), तोरणा (शनिवार पेठ), म्हसोबा (एसडीपीओ आॅफिस), न्यू अमर (शनिवार पेठ), ऋणमुक्तेश्वर (शाहू उद्यान, गंगावेस), ओम (गवळी गल्ली), सर्वोदय (डंगरी गल्ली), रोहिडेश्वर (सारस्वत बँकेसमोर), डांगे गल्ली (जुना बुधवार पेठ). (प्रतिनिधी)