हातकणंगलेत महाविकास आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:24 AM2021-02-10T04:24:16+5:302021-02-10T04:24:16+5:30
हातकणंगले : तालुक्यातील २१ पैकी २० गावांच्या सरपंच, तर २१ गावांच्या उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. आठ ग्रामपंचायतीवर महाविकास ...
हातकणंगले : तालुक्यातील २१ पैकी २० गावांच्या सरपंच, तर २१ गावांच्या उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. आठ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी, ३ ग्रामपंचायतींवर सर्वपक्षीय आघाडी, ३ ग्रामपंचायतींवर शिवसेना, ३ ग्रामपंचायतींवर जनसुराज्य, तर ३ ग्रामपंचायतींवर ताराराणी आघाडीने सत्ता मिळविली. एकमेव कबनूर ग्रामपंचायतीवर भाजप आघाडीने सत्ता संपादन केली. बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवडी पार पडल्या. दुर्गेवाडीमध्ये इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षण असल्याने त्या प्रवर्गाची महिला निवडून आली नसल्याने येथील सरपंचपद रिक्त राहिले.
२० गावांचे सरपंच आणि २१ गावांचे उपसरपंच याप्रमाणे :
जंगमवाडी - सरपंच - चिदानंद शेखर खोत. उपसरपंच - चंपाबाई सुभाष खोत. कुंभोज - सरपंच - दाविद प्रभाकर घोदे, उपसरपंच - दावीद बाळासाहेब घाटगे.
किणी सरपंच - सुप्रिया सुनील समुद्रे
उपसरपंच - अशोक सहदेव माळी.
पाडळी-सरपंच - डॉ. विभा दीपक पाटील
उपसरपंच - रवींद्र वसंत मेथे पाटील, लाटवडे
सरपंच - संभाजी शामराव पवार
उपसरपंच - बाळासो तुकाराम भोपळे
माणगाववाडी - सरपंच - सुजाता मधुकर खोत, उपसरपंच - भाऊसो महादेव खोत. कबनूर - सरपंच शोभा शंकर पोवार, उपसरपंच - उत्तम इरगोंडा पाटील.
तासगाव - सरपंच - चंद्रकांत अण्णा गुरव, उपसरपंच - पौर्णिमा आदिनाथ कांबळे
हालोडी -सरपंच जयश्री काकासो कोळी, उपसरपंच - महावीर अण्णा पाटील. वाठार तर्फ वडगांव सरपंच - तेजस्विनी संतोष वठारकर, उपसरपंच - राहुल बाबूराव पोवार. माणगांव - सरपंच अभय आप्पासो मगदूम, उपसरपंच - अख्तरहुसेन गुलाब भालदार. बिरदेववाडी - जयश्री गजानन नाईक, उपसरपंच - सतीश दत्तात्रय कागले. दुर्गवाडी - सरपंचपद : रिक्त, उपसरपंच - सचिन धोंडीबा घोलप. रुई - सरपंच : करिष्मा इम्रान मुजावर, उपसरपंच - युनूस बाबासो मुजावर. चंदूर - सरपंच अनिता प्रकाश माने, उपसरपंच - भाऊसाहेब दत्तात्रय रेंदाळे. मिणचे - रंजना अशोक जाधव, उपसरपंच - अभिनंदन जिनपाल शिखरे. नेज - सरपंच - दीपाली सदाशिव गोंधळी, उपसरपंच - मनोज धोंडीराम कांबळे. जंगमवाडी - रिना प्रवीण शिंदे. उपसरपंच - शंकर मारुती शिंदे.
मनपाडळे : रायबा हंबीरराव शिंदे, उपसरपंच - उल्हास मधुकर वाघमारे. तिळवणी - सरपंच - राजेश बाबासो पाटील, उपसरपंच - दीपक दिलीप गायकवाड. खोची - सरपंच - जगदीश भीमराव पाटील, उपसरपंच - राेहिणी दादासो पाटील.