शिरोळ तालुक्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:52+5:302021-02-26T04:33:52+5:30
शिरोळ : तालुक्यातील ३३ गावांच्या सरपंच निवडी गुरुवारी पार पडल्या. यात स्थानिक आघाड्यांनी चांगले यश मिळविले असलेतरी महाविकास आघाडीचेच ...
शिरोळ : तालुक्यातील ३३ गावांच्या सरपंच निवडी गुरुवारी पार पडल्या. यात स्थानिक आघाड्यांनी चांगले यश मिळविले असलेतरी महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट झाले. जैनापूर व मजरेवाडी येथे बहुमत नसणाऱ्या आघाडीचा सरपंच झाला, तर घोसरवाड येथे आरक्षणाचा सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले. उदगाव येथे महाविकास आघाडीने सदस्य फोडून सत्ता व सरपंचपद मिळविल्याने स्वाभिमानीची सत्ता संपुष्टात आली.
शिरोळ तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवडी याप्रमाणे -
अर्जुनवाड-स्वाती कोळी (ग्रामविकास पॅनेल), विश्वनाथ कदम (ग्रामविकास पॅनेल), घालवाड-इंद्रजित सरनोबत (शेतकरी विकास पॅनेल), अलका कंदले (शेतकरी विकास पॅनेल), कुटवाड-रेश्मा कांबळे (अपक्ष), वत्सला पाटील (अपक्ष), हसूर-वंदना कुमटाळे (यड्रावकर गट), सुरेंद्र शहापूरे (यड्रावकर गट), शिरटी-अनिता चौगुले (स्वाभिमानी), सागर पवार, नृसिंहवाडी-पार्वती कुंभार (दत्तराज आघाडी), रमेश मोरे (दत्तराज आघाडी), बुबनाळ-सारिका राजमाने (ग्रामविकास आघाडी), भरत मरजे (ग्रामविकास आघाडी), गौरवाड-निलोफर मोमीन (ग्राम सर्वांगीण विकास), अंजली आरबाळे (ग्राम सर्वांगीण विकास), कवठेगुलंद-अश्विनी पाटील (ग्रामविकास आघाडी), शशिकांत शिंदे (ग्रामविकास आघाडी), शेडशाळ-गजानन चौगुले (महाविकास आघाडी), प्रियांका कल्याणी (महाविकास आघाडी), गणेशवाडी-प्रशांत अपिणे, जयपाल खोत, आलास - चंद्रकांत दानोळे (शेतकरी विकास आघाडी), सोनाली कोळी (शेतकरी विकास आघाडी), मजरेवाडी-संगीता परीट (महालक्ष्मी आघाडी), महेश नरुटे (महाविकास आघाडी), बस्तवाड-प्रदीप चौगुले (ग्रामविकास आघाडी), किरण कांबळे (ग्रामविकास आघाडी), तेरवाड-लक्ष्मी तराळ (महाविकास आघाडी), जालिंदर शांडगे (काँग्रेस-शिवसेना आघाडी), शिरढोण-घोसरवाड सरपंचपद रिक्त, मयुर खोत, दत्तवाड-चंद्रकांत कांबळे (यड्रावकर गट), नाना नेजे (अपक्ष), टाकळीवाडी-मंगल बिरणगे (महाविकास आघाडी), भरत पाटील (महाविकास आघाडी), जुने दानवाड-वैशाली पाटील (ब्रम्हनाथ पॅनेल), शालाबाई कोळी (ब्रम्हनाथ पॅनेल), यड्राव-कुणालसिंह नाईक-निंबाळकर (यड्रावकर गट), प्राची हिंगे (यड्रावकर गट), नांदणी-संगीता तगारे, डॉ. सागर पाटील, जांभळी-खंडू खिलारे (गणपतराव पाटील गट), श्रीधर फारणे (गणपतराव पाटील गट), कोंडिग्रे - बाळासाहेब हांडे (ग्रामविकास आघाडी), संगीता काडगे (ग्रामविकास आघाडी), धरणगुत्ती-विजया कांबळे (काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी), जीवनकुमार रजपूत (काँग्रेस, स्वाभिमानी आघाडी), चिपरी-अमृता गावडे (ग्रामविकास परिवर्तन आघाडी), धोंडीराम कांबळे (ग्रामविकास परिवर्तन आघाडी), निमशिरगाव-अश्विनी गुरव (ग्रामविकास आघाडी), ईश्वरा धनवडे (ग्रामविकास आघाडी), तमदलगे-धनाजी नंदिवाले (स्थानिक आघाडी), सुरेखा पाटील (स्थानिक आघाडी), दानोळी-सुनीता वाळकुंजे (नागरिक संघटना), सुनील शिंदे (नागरिक संघटना), जैनापूर-संगीता कांबळे (शाहू आघाडी), आनंदराव बिरंजे (विकास आघाडी), उदगाव- कालीमून नदाफ (महाविकास आघाडी), अॅड. हिदायत नदाफ (महाविकास आघाडी), कोथळी-वृषभ पाटील (बहुजन विकास आघाडी), आकाराम धनगर (बहुजन विकास आघाडी), शिरदवाड-मुक्ता बरगाले (वंचित आघाडी), प्रकाश टोणपे (वंचित आघाडी).