कागलच्या गणेश मंदिराची दानपेटी उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:32 AM2021-06-09T04:32:05+5:302021-06-09T04:32:05+5:30
मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या रकमेत भक्त मंडळ सदस्यांनीही आपली वर्गणीची रक्कम घालून ही मदत केली आहे. तहसीलदार ...
मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या रकमेत भक्त मंडळ सदस्यांनीही आपली वर्गणीची रक्कम घालून ही मदत केली आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे ही औषधे देण्यात आली. मुख्याधिकारी पंडित पाटील, कोविड सेंटरच्या डॉ. उल्का चरापले, व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष सदाशिव पिष्टे, महादेव पाटील( तात्या), मल्लू नाईक, आप्पासो जकाते, अमित पिष्टे, अजित साळुंके, जनार्दन पाखरे, सुनील पोकळे, विनोद पोवार उपस्थित होते.
फोटो कॅपशन
कागल येथील गणेश मंदिराच्यावतीने कागल कोविड केअर सेंटरला दीड लाखाची औषधे प्रदान करण्यात आली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी स्वीकारली. या वेळी मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते.