पंचगंगा स्मशानभूमीस दहा गॅस सिलिंडरची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:07+5:302021-05-21T04:24:07+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव जात आहेत. स्मशानभूमीतील शेणी, लाकडेही त्यांच्या अंत्यविधीसाठी कमी पडू लागली आहेत. त्यामुळे ...
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे जीव जात आहेत. स्मशानभूमीतील शेणी, लाकडेही त्यांच्या अंत्यविधीसाठी कमी पडू लागली आहेत. त्यामुळे गॅसदाहिनीवर ताण वाढला आहे. म्हणून येथील न्यू हायस्कूलच्या ९५-९६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीस दहा सिलिंडर गॅस टाक्या बुधवारी दिल्या. त्या आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
कोल्हापूरकर म्हटले की, हातचे राखून न ठेवता जेवढे हाताला येईल तेवढे देऊन मदत देण्याकरिता सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्याची प्रचिती पुन्हा एकदा आली. न्यू हायस्कूलच्या ९५-९६ च्या माजी विद्यार्थ्यांनी पंचगंगा स्मशानभूमीतील गॅस दाहिनी विभागास दहा व्यावसायिक गॅस सिलिंडर दिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी या माजी विद्यार्थ्यांंचे योगदान समाजासाठी आदर्शव्रत असल्याचे आभार पत्र दिले. यावेळी दयानंद पाटील, विजय वरुटे, विवेक यादव, संदीप माने, गणेश चव्हाण, प्रवीण डांगे, सचिन आयरे, अमोर गुरव, देवबा पाटील, अमर कोठावळे, अरुण पोवार, प्रशांत पोवार, प्रथमेश कुंभार, राहुल काळे, अमोल पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो : २००५२०२१-कोल-गॅस सिलेंडर
ओळी : कोल्हापुरातील न्यू हायस्कूलच्या ९५-९६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी बुधवारी पंचगंगा स्मशनभूमीतील गॅस दाहिनीकरिता दहा सिलिंडर दिले.