बहिरेश्वर येथे पंचगंगा स्मशानभूमीस दहा हजार शेणी दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:27 AM2021-05-25T04:27:55+5:302021-05-25T04:27:55+5:30
स्मशानभूमीत जळण झालेल्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याने शेणी, लाकूड साहित्य दान करण्याचा उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त ...
स्मशानभूमीत जळण झालेल्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कारासाठी कमी पडत असल्याने शेणी, लाकूड साहित्य दान करण्याचा उपक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दानशूर व्यक्ती सहकारी संस्था, तरुण मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात शेणी दान करुन सामाजिक कार्यात . सहभागी घ्यावा असे महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले होते.या आवाहनाला साथ देत करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील २१ युवकांनी १० हजार शेणी, लाकूड साहित्य गोळा करून पंचगंगा स्मशानभूमीला दान देण्यात आले.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत संख्येत वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या शहरी व ग्रामीण लोकांवर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. कोरोनाच्या महामारीमुळे मृताची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नियोजनापेक्षा जास्त मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ स्मशानभूमीवर आली आहे.
त्यामुळे शेणी, लाकूड साहित्याची टंचाई भासत आहे . महानगरपालिकेच्या आवाहनास साथ देत गावातून घरोघरी जाऊन शेणी , लाकूड साहित्य गोळा करण्यात आले. सुमारे १० हजार शेणी व लाकूड साहित्य गोळा करुन पंचगंगा स्मशानभूमीला देण्यात आले.