दौलतनगरातील नागरिकांकडून स्मशानभूमीस शेणीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:24 AM2021-05-26T04:24:26+5:302021-05-26T04:24:26+5:30
कोल्हापूर : दौलतनगर येथील अर्जुन गल्लीतील नागरिकांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदानाचा उपक्रम राबविला. गल्लीतील नागरिकांनी लोकवर्गणीतून जवळजवळ सात हजार शेणी ...
कोल्हापूर : दौलतनगर येथील अर्जुन गल्लीतील नागरिकांनी पंचगंगा स्मशानभूमीसाठी शेणीदानाचा उपक्रम राबविला. गल्लीतील नागरिकांनी लोकवर्गणीतून जवळजवळ सात हजार शेणी जमा केल्या. गेली दीड वर्षे संपूर्ण दौलतनगरसाठी अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या आशासेविका दीपा लोखंडे यांच्या हस्ते या शेणीदान करण्यात आल्या.
दौलतनगर हा परिसर कष्टकऱ्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो; पण ज्या-ज्यावेळी समाजात मदतीची गरज असते त्या त्यावेळी येथील मंडळे आणि नागरिक मदत करण्यास नेहमी पुढे असतात. अशाच प्रकारे मंगळवारी पंचगंगा नदीवर शेणींची गरज लक्षात घेऊन अर्जुन गल्लीतील नागरिकांनी शेणीदानाचा उपक्रम राबविला.
यावेळी प्रतीक जाधव, सरस्वती सातपुते, इंदुबाई माने, लक्ष्मीबाई ढोबळे, निर्मला कापडे, उषा कापडे, सवितादेवी चव्हाण, साधना पलंगे, आक्काताई खडके, विजयमाला जाधव आणि महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.