केजरीवाल यांच्या झोळीत कोल्हापुरातील कष्टकऱ्यांचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 11:30 AM2020-01-31T11:30:45+5:302020-01-31T11:32:35+5:30
दिल्लीत विधानसभेची सध्या निवडणूक सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष तिस-यांदा रिंगणात उतरला आहे. केजरीवाल यांनी आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज या क्षेत्रांत लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशभर कौतुकास्पद आहे. त्याचे अनुकरण येथील सरकारांनीही करावे, याच उद्देशाने ‘सर्व श्रमिक संघ’ या डाव्या संघटनांनी केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक निधी उभारण्याचे आवाहन केले होते.
कोल्हापूर : दिल्लीतील केजरीवाल सरकार आणि कोल्हापुरातील कष्टकरी समाज यांचे म्हटले तर कोणतेही नाते नाही; पण केजरीवाल यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेला राज्यकारभार पाहून भारावलेल्या कोल्हापुरातील कष्टकऱ्यांनी एक-दोन नव्हे, तर चक्क ५० हजार रुपये जमवून निवडणूक निधी म्हणून ‘आप’कडे सुपूर्द केला. या अनोख्या दातृत्वाने ‘आप’चे कार्यकर्तेही भारावून गेले. त्यांनी ‘कष्टकºयांनी घामाच्या पैशांतून दिलेले हे दान वाया जाणार नाही. केजरीवाल विजयी होतीलच आणि कोल्हापूरचे दातृत्वही लक्षात ठेवतील,’ असा आशावाद व्यक्त केला.
दिल्लीत विधानसभेची सध्या निवडणूक सुरू आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ पक्ष तिस-यांदा रिंगणात उतरला आहे. केजरीवाल यांनी आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक, पाणी, वीज या क्षेत्रांत लोकाभिमुख कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशभर कौतुकास्पद आहे. त्याचे अनुकरण येथील सरकारांनीही करावे, याच उद्देशाने ‘सर्व श्रमिक संघ’ या डाव्या संघटनांनी केजरीवाल यांच्यासाठी निवडणूक निधी उभारण्याचे आवाहन केले होते. यास अनुसरून लाल निशाण पक्ष, बँक एम्प्लॉईज, शेतमजूर संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, मेकॅनिकल युनियन, पेन्शन संघटना, आदींनी एकत्र येत आपल्या घामातून मिळविलेल्या दामापैकी काही रक्कम निवडणूक निधी म्हणून संकलित केली. ती ५० हजार इतकी झाली.
शनिवारी लक्ष्मीपुरीतील सर्व श्रमिक संघाच्या संतराम पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात हा निधी सुपूर्द केला गेला. आप पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय देसाई यांच्याकडे अतुल दिघे, प्रकाश जाधव, सुवर्णा तळेकर, सुधाकर सावंत, आनंद कुलकर्णी, एस. टी. पाटील, प्रकाश कांबळे यांच्या हस्ते कष्टकºयांच्या उपस्थितीत तो देण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारांकडून कष्टक-यांंची आबाळच होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे हित पाहणारे केजरीवाल सरकार हे आशादायी चित्र आहे. त्यांना पाठबळ म्हणून हा उपक्रम राबविला. त्याला कष्टकºयांनी दिलेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहे.
- अतुल दिघे, सर्व श्रमिक संघ
कोल्हापूरकरांना दिल्लीशी थेट संबंध नसतानाही चांगल्याला चांगले म्हणण्याची कोल्हापूरकरांच्या प्रवृत्तीचेच दर्शन यातून घडले आहे. पक्षांना मोठ्या देणग्या मिळतात; पण दुसºया पक्षाला आणि स्वत:कडे थोडेच असतानाही निधी जमविणे हे खूपच कौतुकास्पद आहे.
- संजय देसाई, आप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष