दातृत्वातून बदलणार आदमापूरच्या शाळेचे रूप!, बाळूमामाचे भक्त देवदत्त गंगावलेंच्या योगदानातून डिजिटल शाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 12:12 PM2022-05-12T12:12:16+5:302022-05-12T12:12:42+5:30

देवदत्त गंगावले यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.

Donations will change the look of Adampur school, Digital School with the contribution of Balumama devotee Devdutt Gangavale | दातृत्वातून बदलणार आदमापूरच्या शाळेचे रूप!, बाळूमामाचे भक्त देवदत्त गंगावलेंच्या योगदानातून डिजिटल शाळा

दातृत्वातून बदलणार आदमापूरच्या शाळेचे रूप!, बाळूमामाचे भक्त देवदत्त गंगावलेंच्या योगदानातून डिजिटल शाळा

Next

बाजीराव जठार

वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी तब्बल साठ लाख रुपयांचे दातृत्व लाभल्याने या शाळेचे रूपडे अंतर्बाह्य पालटणार आहे. बाळू मामा यांचे मुंबई येथील भक्त ॲड. देवदत्त गंगावले यांच्या या आर्थिक योगदानातून आठ खोल्यांची सुंदर अशी शाळा साकारण्यात येणार आहे.

सध्या गावामध्ये आठ खोल्यांची इमारत बाळू मामांचे कार्यस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरगूबाई मंदिर परिसरात आहे. आदमापूर येथे अत्याधुनिक डिजिटल शाळा उभा करावी, अशी मागणी देवालय समितीकडे ग्रामस्थांनी केली होती. त्यातच देवदत्त गंगावले यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला.

गावठाण परिसरात पाण्याच्या टाकी शेजारी ही भव्य-दिव्य वास्तू उभारली जाणार आहे. शिक्षणक्षेत्रातील चांगल्या कामासाठी ॲड. गंगावले हे बाळू मामाचे निस्सीम भक्त जणू देवदूत बनून समोर आले आहेत. चांगली शाळा उभी राहणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


या गावचा काहीतरी देणे लागतो, यासाठी येथील प्राथमिक शाळेची इमारतीचे बांधकाम करून देणार आहे. येथील मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तयारी आहे. - ॲड. देवदत्त गंगावले, मुंबई.

Web Title: Donations will change the look of Adampur school, Digital School with the contribution of Balumama devotee Devdutt Gangavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.