कोरोनाच्या नव्या 'जेएन-१ व्हेरीयंट' ला घाबरु नका, योग्य काळजी घ्या - तानाजी सावंत
By संदीप आडनाईक | Published: December 24, 2023 08:16 PM2023-12-24T20:16:14+5:302023-12-24T20:16:57+5:30
येत्या १५ दिवसात राज्यातील साडेबारा कोटी जनतेला सरसकट शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
कोल्हापूर : कोरोनाचा नवा जेएन-१ व्हेरीयंट हा फार धोकादायक नसून नागरिकांनी याबाबत घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी. घरातून बाहेर जाताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले. कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी रविवारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
मंत्री सावंत म्हणाले, जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांच्या निर्देशानुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. राज्यातील सर्वच महत्वाच्या हॉस्पीटल्समध्ये मॉकड्रील पूर्ण केले आहे. रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा सक्षम ठेवल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घाबरुन जाऊ नये. मात्र काळजी घ्यावी. गंभीर आजारी रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच गरज असेल तिथे मास्क, सोशल डिस्टन्सचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सरसकट शासकीय आरोग्य सुविधा १५ दिवसात
येत्या १५ दिवसात राज्यातील साडेबारा कोटी जनतेला सरसकट शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.