९६ कुळीचा बाऊ करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:27 AM2021-02-16T04:27:02+5:302021-02-16T04:27:02+5:30
मराठा महासंघातर्फे येथील श्री शाहू सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केलेल्या मराठा समाज आणि वधू-वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रय ...
मराठा महासंघातर्फे येथील श्री शाहू सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केलेल्या मराठा समाज आणि वधू-वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रय वारके होते. मराठा समाजाची आजची स्थिती म्हणजे जॉब लेस, लँड लेस आणि मणी लेस अशी आहे. आज समाजाने स्वतःकडे पाहिले नाही, तर बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे ‘आता नाही तर कधीच नाही’ ही भावना ठेवून संघर्षाची तयारी ठेवूया, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले. या मेळाव्यात राष्ट्रपती पदक विजेते पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, डाॅ. देवरस तोरस्कर, गिरीष कोरे, कमलाकर कराळे, राजदीप भोसले, प्रकाश जाधव यांचा सत्कार करण्यात आला. बबनराव रानगे, उत्तम जाधव, प्रकाश पाटील, शंकरराव शेळके, शिवाजी मोरे, इंदूजी शिरगावकर, मुकुंद पाटील, अनिल पाटील, सचिन इंगवले, आदी उपस्थित होते. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. शैलजा भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विजय काकोडकर यांनी आभार मानले.
चौकट
एकसंध व्हावे
मराठा आरक्षणाला स्थगिती, सारथी संस्थेचे ठप्प असलेले कामकाज, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची बरखास्त झालेली समिती अशा परिस्थितीत मराठा समाजाने सामाजिक जागृतीने एकसंध व्हावे, असे आवाहन मुळीक यांनी केले.
फोटो (१५०२२०२१-कोल-मराठा समाज मेळावा) : कोल्हापुरात शनिवारी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शैलजा भोसले, दत्तात्रय वारके, बबनराव रानगे, शंकरराव शेळके, आदी उपस्थित होते.