‘जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:54+5:302020-12-09T04:18:54+5:30
कोल्हापूर : जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग न करता व्यापारी व उद्योजकांना संधी द्यावी, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ ...
कोल्हापूर : जीएसटी ई-वे बिल ब्लॉकिंग न करता व्यापारी व उद्योजकांना संधी द्यावी, अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे व आमदार चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना मंगळवारी देण्यात आले.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, कोरोनामुळे २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. परिणामी जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापाऱ्यांचे दैनंदिन व्यवहार पूर्णत: बंद होते. बार, रेस्टॉरंट, हॉटेलमालक यांचा व्यवसाय ४ ऑक्टोबरपर्यंत बंद होता. तरीही स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. त्यामुळे उद्योजक, व्यापाऱ्यांची आर्थिक व व्यावसायिक परिस्थिती बिकट झाली असून सुमारे ४० टक्के लहान आणि मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या सर्वांचा विचार होणे आवश्यक आहे. असे असतानाच जीएसटीचे मासिक रिटर्न भरताना ऑनलाईन समस्या येतात. यामुळे व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. तसेच दंडही वसूल केला जातो. या सर्वांवर मार्ग काढण्यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची लवकरच बैठक बोलावू. या बैठकीला उपस्थित राहून शंकांचे निरसन आणि मार्गदर्शन करावे, असे शेटे यांनी जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना सांगितले.
आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, व्यापाऱ्यांच्या मागण्या, समस्या केंद्रीय जीएसटी कौन्सिल यांच्याकडे पाठवून त्यांचा पाठपुरावा करू. यावेळी चेंबरचे संचालक अजित कोठारी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आशिष शहा, केंद्रीय जीएसटी विभाग, कोल्हापूरचे सहआयुक्त राहुल गावंडे, उपायुक्त धनंजय कदम उपस्थित होते.
फोटो : ०८१२२०२० कोल जीएसटी निवेदन
ओळी : जीएसटीसंदर्भात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून केंद्रीय जीएसटी विभागाचे आयुक्त विद्याधर थेटे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, संजय शेटे, अजित कोठारी, आशिष शहा, आदी उपस्थित होते.