बाबासाहेबांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:22 AM2021-04-16T04:22:50+5:302021-04-16T04:22:50+5:30
गडहिंग्लज : ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्राद्वारे तरुणाईला स्वत:च्या आणि देशाच्या उन्नतीची प्रेरणा देणा-या डॉ. बाबासाहेब ...
गडहिंग्लज : ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्राद्वारे तरुणाईला स्वत:च्या आणि देशाच्या उन्नतीची प्रेरणा देणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या भिंतीत बंदिस्त करू नका, असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. के. गोटुरी यांनी केले.
येथील ज्ञानदीप प्रबोधिनीच्या झेप अॅकॅडमीतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. दत्ता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
गोटुरी म्हणाले, उत्सवप्रियतेमुळे वास्तवातील जगण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे तरुणांनी विज्ञाननिष्ठ आणि विवेकवादी व्हावे. ध्येय आणि जगण्याचा हेतू निश्चित करून आत्मविश्वासाने प्राप्त परिस्थितीला सामोरे जावे, नक्कीच यश मिळेल.
यावेळी गणेश शेटे, सानिका लाड, प्रतीक्षा जंगली यांनीही मनोगत व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष मल्लाप्पाण्णा चौगुले यांनी प्रास्ताविक केले. ऋतुजा धनवडे यांनी सूत्रसंचलन केले. मोनिका रोगे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास खजिनदार महेश मजती, सुभाष पाटील, संजय चौगुले, प्राचार्या मीना रिंगणे, रेखा पोतदार, गौरी बेळगुद्री आदी उपस्थित होते.
--
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे झेप अॅकॅडमीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी एम. एल. चौगुले, डी. के. गोटुरी, दत्ता पाटील, मीना रिंगणे, महेश मजती, सुभाष पाटील, रेखा पोतदार आदी उपस्थित होते.
क्रमांक : १५०४२०२१-गड-०१