'व्होकेशनल'चे रूपांतर नको, 'सक्षमीकरण' करा, मलिक यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 02:44 PM2020-10-23T14:44:32+5:302020-10-23T14:47:25+5:30
educationsector, nawab malik, hasan musrif, kolhapurnews कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
गडहिंग्लज : कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील व्होकेशनल शिक्षणाचे रूपांतर नको, सक्षमीकरण करावे अशी आग्रही मागणी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघातर्फे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत मलिक यांची भेट घेतली.राज्यात तीन दशकांपासून यशस्वी सुरू असलेल्या या योजनेचे रूपांतर ऐवजी सक्षमीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक, आमदार रोहित पवार , आमदार राजेश पाटील उपस्थित होते.
मलिक म्हणाले, केंद्राच्या धोरणानुसारच या योजनेचे रूपांतर होईल.आमदार काळे समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. चर्चेत प्रा.कोरी,माने, डॉ.चव्हाण, आसगांवकर, देसाई यांनीही भाग घेतला.यावेळी कौशल्य शिक्षण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, संचालक दीपेंद्रसिंह कुशवाह हेही उपस्थित होते.
शिष्टमंडळात गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने,जयंत आसगवकर, सुनील देसाई, डॉ. यशवंत चव्हाण ,उदय पाटील ,विनोद उत्तेकर, सुधाकर कोरवी,डॉ.श्रीकांत हेबाळकर यांचा समावेश होता.
मलिक 'रूपांतरा'वर ठाम!
कौशल्यावर आधारित फाईव्ह स्टार आय टी आय योजनाच प्रभावी ठरू शकते, शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल .कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट करत मंत्री मलिक यांनी आय. टी. आय, व्ही. टी. पी. योजनेचे यावेळी समर्थनच केले.
मुश्रीफ शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पाठीशी!
राज्यातील व्होकेशनल शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही, चांगल्या योजनेच्या सक्षमीकरणासाठी आपण संस्था चालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे मुश्रीफ यांनी सांगितले.