महापालिकेच्या त्या खुल्या जागेसंबंधी व्यवहार करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:23 AM2021-09-03T04:23:47+5:302021-09-03T04:23:47+5:30

कोल्हापूर : येथील गजानन महाराजनगरातील मंजूर रेखांकनामधील महापालिकेच्या खुल्या जागेसंबंधी खरेदी, विक्रीसाठी कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये, असे आवाहन ...

Don't deal with that open space of the corporation | महापालिकेच्या त्या खुल्या जागेसंबंधी व्यवहार करू नये

महापालिकेच्या त्या खुल्या जागेसंबंधी व्यवहार करू नये

Next

कोल्हापूर : येथील गजानन महाराजनगरातील मंजूर रेखांकनामधील महापालिकेच्या खुल्या जागेसंबंधी खरेदी, विक्रीसाठी कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये, असे आवाहन महापालिका नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी केले आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची ओपन स्पेस नाही. मालमत्ता पत्रकास त्यांचे नाव नाही. तसे नगररचना विभागास कळवल्याचे बापू शेळके यांनी म्हटले आहे.

संभाजीनगरातील गजानन महाराजनगर परिसरातील सि.स.नं.२६२ ब/८( जुना रि.स.नं.६९४) यांचे प्रॉपर्टी कार्ड आहे. यामध्ये क्षेत्र ६०२.४० चौरस मीटर मंजूर रेखांकनानुसार क्षेत्र ६५२५ चौरस फूट (६०६.५० चौ.मी.) इतक्या क्षेत्रास ४ जानेवारी १९८८ रोजीच्या रेखांकनामध्ये खुली जागा म्हणून मंजुरी मिळालेली आहे. या खुल्या जागेची चतुःसीमा पूर्वेस रि.स.नं.६९५ च्या मंजूर रेखांकनातील खुली जागा, पश्चिमेस-कॉलनी रस्ता, दक्षिणेस रि.स.नं.६९४ पैकी भूखंड क्रमांक ७ ही जागा लेडीज हॉस्टेलची आहे. उत्तरेस रि.स.नं.६९४ पैकी भूखंड क्रंमाक ८ (यशवंत विद्यालय) याप्रमाणे आहे. या जागेची विक्री करण्यासाठी ॲड. सागर आर. पाटील यांनी १७ ऑगस्ट २०२१ रोजी नोटीस प्रसिद्ध केली आहे. या नोटीसला महापालिकेने व जागेतील संरक्षित कुळांचे वारसदार सुनील यशवंत चिले, अनिल चंद्रकांत चिले, दिलीप आत्माराम चिले यांनी मिळकत विक्रीच्या प्रसिद्ध केलेल्या नोटिसीवर विहीत मुदतीत हरकत घेतलेली आहे. ही जागा महापालिकेची मिळकत आहे. सार्वजनिक हितासाठी राखीव असल्याने या मिळकतीवर महापालिकेने कायदेशीर फलक लावलेला आहे. त्यामुळे या मिळकतीच्या खरेदी-विक्रीबाबत कोणताही व्यवहार करण्यात येऊ नये, असे आवाहन महापालिकेच्या नगररचना विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Don't deal with that open space of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.