कामगारविरोधी कायदे राज्यात लागू करू नका :जयप्रकाश छाजेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 06:15 PM2021-01-02T18:15:14+5:302021-01-02T18:19:47+5:30
Jayprakash Chhajed Kolhapur- केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने बोलवावे व हे कायदेच महाराष्ट्रात लागू करु नयेत यासाठी महाराष्ट्र इंटकतर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : केंद्र सरकारने केलेल्या कामगार व शेतकरीविरोधी कायद्याला पायबंद घालण्यासाठी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने बोलवावे व हे कायदेच महाराष्ट्रात लागू करु नयेत यासाठी महाराष्ट्र इंटकतर्फे लवकरच मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष, माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
छाजेड म्हणाले, केंद्राने कायदा केल्यामुळे राज्यातील अनेक उद्योग-व्यवसाय मालकांनी कामगारांना तडकाफडकी काढून टाकले. याची राज्य कामगार मंत्रालयाने गंभीर नोंद घेणे गरजेचे होते. कामगारांमध्ये केंद्राने केलेल्या कायद्याची प्रचंड दहशत आहे. मोर्चाची तारीख लवकरच ठरवली जाईल.
अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत माथाडी कामगार बोर्डाची फेररचना करावी. त्यात प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली होती, असे छाजेड यांनी सांगितले. यावेळी हिंदुराव पाटील-वाकरेकर, शामराव कुलकर्णी, अप्पा साळोखे, सुरेश सूर्यवंशी, आनंदा दोपारे, मुकेश तिगोटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.