पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:09+5:302021-06-29T04:18:09+5:30

कोल्हापूर : पत्रकारितेला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये, असे आवाहन पुण्याचे ...

Don't exalt crime through journalism | पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको

पत्रकारितेतून गुन्हेगारीचे उदात्तीकरण नको

Next

कोल्हापूर : पत्रकारितेला मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून कोणत्याही गुन्हेगाराचे उदात्तीकरण होऊ नये, असे आवाहन पुण्याचे पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे यांनी सोमवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनातर्फे आयोजित ‘गुन्हेगारी बातम्या आणि पत्रकारांची जबाबदारी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. काळानुरूप गुन्ह्यांच्या स्वरूपात बदल होत आहे. या बदलाची नोंद त्यांनी घ्यावी. नि:पक्ष, तटस्थ आणि जबाबदार पत्रकारिता समाजाला पुढे घेऊन जाते. पत्रकारांना माहिती मिळविण्यासाठी अनेक स्रोतांकडून माहिती घ्यावी लागते. परंतु ही माहिती वस्तुनिष्ठ आहे का, याचा विचारही त्यांनी करायला हवा. पोलीस यंत्रणा पत्रकारांना अधिकृत माहिती देतात. त्यावर त्यांनी विश्‍वास ठेवावा, असे आवाहन मितेश घट्टे यांनी केले. सूत्रांची माहिती किंवा ऐकीव माहिती दिल्याने अनेकवेळा गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. माहितीची खात्री होणार नसेल, तर अशी माहिती टाळणे योग्य ठरेल. कोणत्याही घटनेचा विविध अंगाने परामर्श घेणेही तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुमेधा साळुंखे यांनी आभार मानले.

चौकट

सोशल मीडियाच्या माध्यमातून विकृती जन्माला येऊ पाहत आहे. आर्थिक फसवणुकीसह अनेक प्रकारची व्हाईट कॉलर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. अशा वेळी पत्रकारांसह पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. पोलीस आणि पत्रकार यांनी एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींचा मुकाबला करणे आवश्यक आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात गुन्हेविषयक पत्रकारिता करताना संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेकडे पाहावे, असे आवाहन मितेश घट्टे यांनी केले.

फोटो (२८०६२०२१-कोल-मितेश घट्टे (व्याख्यान)

Web Title: Don't exalt crime through journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.