कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:27 AM2021-08-26T04:27:23+5:302021-08-26T04:27:23+5:30

कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ या बाबतीत कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. कायदा पाळणाऱ्या मालवाहतूकदारांना द्यावे, ...

Don't give police protection to traders who break the law | कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नका

कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नका

Next

कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ या बाबतीत कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलिसांनी संरक्षण देऊ नये. कायदा पाळणाऱ्या मालवाहतूकदारांना द्यावे, अशी मागणी बुधवारी कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे केली. अशाच पद्धतीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनाही दिले.

‘ज्याचा माल त्याचा हमाल’ व ‘ज्याचा माल त्याचा विमा’ याबाबत गेल्या दोन वर्षांपासून असोसिएशन आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी संबंधितांची बैठक घेतली होती. यात कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार आयुक्तांना दिले होते. परंतु व्यापारी आम्हास वारणी घेतल्याशिवाय ट्रकमध्ये माल भरणार नाही, असे म्हणत आहेत. आमचा काहीही संबंध नसताना वाहतूकदारांना वेठीस धरत आहेत. शासनाने कायदा करूनही व्यापारी तो मोडण्यासाठी आपणाकडे पोलीस संरक्षण मागत आहेत. तरी कायदा मोडणाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नये. कृती आराखड्यानुसार आम्हाला वारणी मागणाऱ्या व देण्यास भाग पाडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, पंडित कोरगावकर, विजय भोसले, अभय घारे, आदी उपस्थित होते.

फोटो -२५०८२०२१-कोल-लाॅरी ऑपरेटर्स

ओळी : कायदा मोडणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस संरक्षण देऊ नये, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा लाॅरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे बुधवारी करण्यात आली.

Web Title: Don't give police protection to traders who break the law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.