वशिला लावून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:27 AM2021-09-06T04:27:33+5:302021-09-06T04:27:33+5:30

मुरगूड : आदर्श शिक्षक हा आदर्शच असला पाहिजे, त्याला वशिल्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित करत आदर्श शिक्षक पुरस्कार ...

Don't go for less that your full potential | वशिला लावून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवू नका

वशिला लावून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवू नका

googlenewsNext

मुरगूड : आदर्श शिक्षक हा आदर्शच असला पाहिजे, त्याला वशिल्याची काय गरज? असा प्रश्न उपस्थित करत आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्यासाठी आमच्या पत्राची आवश्यकता कशाला. पण आपली यंत्रणाच इतकी गढूळ झाली आहे की, वशिल्याशिवाय पुरस्कार मिळतच नाही. पण वशिला लावून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवण्याचा प्रयत्न करू नका, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. शिवाय, भारतातील अत्याधुनिक शाळा कागल तालुक्यातील केनवडे येथे सुरू करत असल्याची घोषणा ही त्यांनी केली.

शिक्षक दिनानिमित्त हसन मुश्रीफ फौंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेल यांच्या वतीने कागल, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील ५२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि. प.चे माजी अध्यक्ष युवराज पाटील होते. या वेळी संदीप गुंड व गटशिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर यांचा मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर निवड समितीने निवडलेल्या ५२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भय्या माने, जी. एस. पाटील, सुकुमार पाटील, पद्मश्री गुरव, रफिक पटेल, संदीप गुंड यांनी मनोगत व्यक्त केली. स्वागत शिक्षक सेलचे अध्यक्ष शंकर संकपाळ यांनी, तर प्रास्ताविक वक्ता सेलचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमास नगराध्यक्षा माणिक माळी, सभापती रमेश तोडकर, जि. प. सदस्य सतीश पाटील, वसंत धुरे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, मनोज फराकटे, दिग्विजय पाटील, प्रकाश गाडेकर, आदी प्रमुख उपस्थित होते.आभार अरविंद पाटील यांनी मानले.

शिक्षकांच्या सर्व बदल्या या ऑनलाइन पद्धतीने लवकरच होणार असून, याबाबतचे ॲप सॉफ्टवेअर काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो ओळ :- शिक्षक दिनानिमित्त हसन मुश्रीफ फौंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेल यांच्या वतीने कागल,गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील ५२ शिक्षक व कर्मचाऱ्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, के.डी. सी. सी. संचालक भय्या माने, सतीश पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विकास पाटील, नगराध्यक्षा माणिक माळी, सभापती रमेश तोडकर आदी.

Web Title: Don't go for less that your full potential

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.