क्षयरोग लपवू नका, तपासणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:47 AM2020-12-17T04:47:26+5:302020-12-17T04:47:26+5:30
शिरोली : क्षय व कुष्ठ सर्वेक्षणात लक्षणे न लपविता सर्वांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य संचालक ...
शिरोली : क्षय व कुष्ठ सर्वेक्षणात लक्षणे न लपविता सर्वांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य संचालक डॉ. पी. आर. पाटील यांनी केले. हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शिरोलीत स्मॅक भवन येथे आयोजित केलेल्या एकदिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, क्षय व कुष्ठरुग्ण शोध अभियान डिसेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. क्षयरोगाची लक्षणे दिसली तर लपवू नका. यावेळी डॉ. यु. जी. कुंभार, डॉ. फारुक देसाई यांनी मार्गदर्शन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी हातकणंगले तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाचा आढावा मांडला. शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्युस, आरोग्य संचालक डॉ. पटेल यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
फोटो १६ शिरोली आरोग्य केंद्र
ओळी - शिरोली स्मॅक भवन येथे आयोजित केलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेले वैद्यकीय अधिकारी.