खाटीक समाज सभागृह ठरावाचा अंमल नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:24 AM2021-04-02T04:24:56+5:302021-04-02T04:24:56+5:30
गडहिंग्लज : पोतदार रेखांकनातील खुल्या जागेत खाटीक समाजासाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, ...
गडहिंग्लज :
पोतदार रेखांकनातील खुल्या जागेत खाटीक समाजासाठी सांस्कृतिक सभागृह बांधण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुश्रीफ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संबंधित जागा नगरपालिकेच्या फंडातून खरेदी केली आहे. त्यातील खुल्या जागेत खाटीक समाजाला सभागृह बांधून देण्याचा निर्णय म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे.
लोकभावना लक्षात घेऊन खाटीक समाज सभागृहप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री व जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे.
शिष्टमंडळात, नगरसेवक दीपक कुराडे, दयानंद पाटील, जगदीश पट्टणशेट्टी, मल्लिकार्जुन बेल्लद, सौरभ मणीयार, काशिनाथ बंदी, संजय घाळी, राजेश शहा, संतोष बेळगुद्री, विजय शिवबुगडे, सुमित मणियार आदींचा समावेश होता.