बाजार समितीची कोट्यवधीची गुंतवणूक : धान्य व्यापाऱ्यांना ‘लक्ष्मीपुरी’ सोडवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 10:53 AM2020-02-01T10:53:26+5:302020-02-01T10:55:36+5:30

लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; पण त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून तिथे जाण्यास व्यापारी तयार नव्हते.

Don't leave 'Laxmipuri' to the grain dealers | बाजार समितीची कोट्यवधीची गुंतवणूक : धान्य व्यापाऱ्यांना ‘लक्ष्मीपुरी’ सोडवेना

बाजार समितीची कोट्यवधीची गुंतवणूक : धान्य व्यापाऱ्यांना ‘लक्ष्मीपुरी’ सोडवेना

googlenewsNext
ठळक मुद्देप्लॉट परत घेण्याच्या हालचाली

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा टेंबलाईवाडी धान्य बाजार स्थलांतराचा कार्यक्रम व्यापाऱ्यांनी मोठ्या धूमधडाक्यात केला. मात्र, अद्याप त्यांना लक्ष्मीपुरी सोडवेना झाली आहे. समिती प्रशासनाने कोट्यवधी रुपये गुंतवणूक करूनही व्यापारी तिथे न गेल्याने समितीला सुरक्षा, वीज व पाण्यावर महिन्याला अडीच लाख रुपयांचा भुर्दंड बसत आहे. व्यापाºयांना त्या जागेवर व्यवसायच करायचा नसेल, तर त्यांचे प्लॉट परत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजाराचा ताण कोल्हापूर शहरातील वाहतुकीला बसत असल्याने बाजार समितीने टेंबलाईवाडी येथील मोकळ्या जागेत धान्य बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. येथील २२ एकर जागेवर २००७ ला समितीने २१३ प्लॉट पाडून ते धान्य व्यापाºयांना दिले; पण त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणावरून तिथे जाण्यास व्यापारी तयार नव्हते. अकरा वर्षे जागा तशीच पडून राहिली आणि बाजार लक्ष्मीपुरीतच सुरू राहिला. मात्र, दिवसेंदिवस वाहतूक वाढत गेल्याने धान्य बाजार स्थलांतराचा विषय पोलीस अधिकाºयांनीच हातात घेतला. मार्च २०१८ मध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यापारी, समिती प्रशासनाची बैठक घेऊन बाजार स्थलांतरित करण्यासाठी ज्या सोयी-सुविधा लागतात त्याची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डिसेंबर २०१८ मध्ये सर्व सोयींची पूर्तता झाली, यासाठी समितीला सव्वा कोटीचा खर्च आला. तिथे २४ तास खासगी सुरक्षा तैनात केली. वीज व पाण्याची व्यवस्था करून तिथे पोलीस चौकीही सुरू केली. त्यानंतर काही व्यापाºयांनी मोठा गाजावाजा करीत समितीची वाट न पाहता पोलीस अधिकाºयांच्या हस्ते स्थलांतर केले. मात्र, वर्ष झाले, एकही व्यापारी तिथे गेला नाही.

ज्या काही चार-पाच व्यापाºयांनी बांधकामे केली आहेत, त्यांचाही केवळ गोडावून म्हणूनच वापर होतो. बाजार स्थलांतरित झालाच नाही. मात्र, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत आणि महिन्याला अडीच लाख रुपये खर्च होत आहेत. व्यापा-यांना स्थलांतरित व्हायचे नसेल, तर त्यांच्याकडून प्लॉट घेऊन तिथे व्यवसायवृद्धीच्या दृष्टीने काही करता येते का? हे बघावे, असा विचार समिती प्रशासनाचा आहे.
 

  • संचालकांची अनास्था!

मुळात समितीच्या संचालक मंडळालाच हा बाजार स्थलांतरित व्हावा, असे वाटत नाही. त्यांची अनास्था असल्यानेच बारा वर्षे भिजत घोंगडे राहिले आहे.

  • २५ हून अधिक प्लॉट नेत्यांच्या नावाने

येथे २१३ प्लॉट आहेत. त्यापैकी १६० प्लॉट हे धान्य व्यापाºयांचे आहेत. उर्वरित ५३ पैकी २५ हून अधिक प्लॉट हे जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया नेत्यांच्या नावावर आहेत.
 

  • दृष्टिक्षेपात टेंबलाईवाडी बाजार :

जागा : २२ एकर
प्लॉट : २१३
प्लॉटचे क्षेत्रफळ : ८६३ ते १४८० चौरस फूट
सुविधांसाठी आलेला खर्च : १.२५ कोटी
महिन्याला येणारा खर्च : सुरक्षा - १.६७ लाख, वीज -३० हजार, पाणी व देखभाल दुरुस्ती - २५ हजार .

 

धान्य बाजार स्थलांतरित करण्यासाठी आमचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आता संबंधितांना नोटिसा देऊन ते स्थलांतरित होणार नसतील तर प्लॉट समितीच्या ताब्यात घेतले जातील.
- दशरथ माने, सभापती, बाजार समिती.
 

 

Web Title: Don't leave 'Laxmipuri' to the grain dealers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.