स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनेचे बिल १५ व्या वित्त आयोगातून भरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:17+5:302021-07-03T04:17:17+5:30
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन आजरा : पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनेचे बिल न भरणे तसेच ...
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
आजरा :
पंधराव्या वित्त आयोगाच्या रकमेतून स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनेचे बिल न भरणे तसेच ग्रामपंचायतसाठी कर वसुलीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीऐवजी स्थानिक कर सल्लागार यांच्याकडूनच ही कामे करून घ्यावीत व संबंधित एजन्सीचे काम रद्द करण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांना सरपंच परिषद मुंबई, शाखा आजाराच्यावतीने देण्यात आले.
१५ व्या वित्त आयोगमधील आराखडे तयार करताना व कामे करताना येत असलेल्या अडचणीविषयी गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांचेशी सविस्तर चर्चा करणेत आली.
तालुकाध्यक्ष संतोष बेलवाडे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजाराम पोतनीस, संघटनेचे मार्गदर्शक मारुती मोरे, सचिव अमोल बांबरे, महिला कार्यकारिणी सदस्या वैशाली गुरव, मेंढोलीचे सरपंच अॅड. लक्ष्मण गुडुळकर, वसंत देसाई, आप्पासाहेब सरदेसाई, महेश कांबळे, अरुण जाधव यांच्याहस्ते निवेदन देण्यात आले.